
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा अस्त्र काढलंय तसं बघितलं तर मराठा आरक्षणाची मागणी आणि मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण ही ठरलेली बाब मराठा समाजासाठी कुणालाही अंगावर घेण्याची त्यांची तयारी मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्यात यावं हीच मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी यासाठी जरांगे पाटलांनी तब्बल सहा वेळा उपोषण केली सरकार विरोधात हल्लाबोल केला देवेंद्र फडणवीस यांना खास करून निशाणावर ठेवलं जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा लोकसभेला महायुतीला तोटा झाला.
विधानसभेचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर महायुतीला त्याचा फायदा झाला पण आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यावर आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची चर्चा सुरू झाल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार बाहेर काढले त्यामुळे सरकारची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबद्दल नेमक्या कोणकोणत्या मागण्या आहेत आणि मराठा आरक्षणाचा फटका फडणवीस सरकारला कसा बसू शकतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जवळपास मागील 18 महिन्यापासून आंदोलन करत आहेत.
मराठा आरक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केलंय तर एकदा ते मुंबईच्या वेशीवर जाऊन आलेत जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला होता त्यामुळं विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र या विधानसभेला महायुतीला घमघवीत यश मिळालं जरांगे पाटलांनी आपल्या प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीसांवर पातळी सोडून टीका केली आता हेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जरांगेंनी सरकारला दिलेला शब्द पाळा अशी आठवण करून दिली आहे एवढंच नाही तर मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन करणार असा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता त्यानुसार आजपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी अंतरवाडी सराटी इथे बसलेत आता उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे आठ प्रमुख मागण्या केल्यात त्यातली पहिली मागणी म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहेत म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं . दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटिअर सातारा संसद गॅझेटिअर मुंबई गव्हर्मेंट गॅजेटियर लागू करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेली
तिसरी मागणी म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करावं आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी.
चौथी मागणी म्हणजे सगळे सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी जर पाटलांनी केलेली .
पाचवी मागणी म्हणजे ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात तसंच या आंदोलकांवरील सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत .
सहावी मागणी म्हणजे सरकारने 10% एससीबीसी आरक्षण लागू केलं आणि मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केलं ते ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा सुरू करावं.
सातवी मागणी म्हणजे कुणबी नोंदणी शोधण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर जे कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावेत याशिवाय वंशावळ समिती मोड लिपी समिती आणि सर्व भाषेच्या अभ्यासकांची मोठी टीम तात्काळ नोंदणी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेली.
आठवी मागणी ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग म्हणजेच कुणबी आहे ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे आणि 2004 सालचा अध्यादेश आहे मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहेत हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही ज्या काही मागण्या केल्यात त्या सगळ्या मागण्या जुन्याच आहेत . एकही नवीन मागणी नाहीये त्यामुळं या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी आता बेईमानी केली तर समाज आता सहन करणार नाहीये. आंदोलनाचं लोण महाराष्ट्रभर पसरणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
एकीकडे मस्स्याजोग चे सरपंच संतोष देशमुखचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे आधीच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्य सरकार विरोधात लोकांची नाराजी आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणुका सुद्धा अगदी तोंडावर आहेत. अशा वेळी जरांगे पाटलांचे उपोषण सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा डॅमेज करू शकतं ,म्हणून जरांगे पाटील यांनी आज जरी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी नरमाईची भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची बेईमानी करणार नाहीत असं म्हटलं असलं तरी आरक्षण न मिळाल्यास याच जरांगे पाटलांची तोप कधी फडणवीसांवर धडा देईल हे काही सांगता येत नाहीये, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस या संघर्षाचा दुसरा अध्याय आपल्याला लवकरच बघायला मिळू शकतो . बाकी तुम्हाला काय वाटतं मनोज जरागे पाटील यांच्या उपोषणाचा सरकारला फटका बसेल देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाज आरक्षण मिळवून देतील का तुमचं मत आ णि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी कृषि २४ या वेबसाइडला पाहण्यासाठी विसरू नका लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद..