आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे.तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. . ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पेरणी करून ठेवलेले शेतकरी पावसाची वाट पाहत होते .
त्यांच्यासाठी खरंतर ही आनंदाची बातमी आहे .उन्हामुळे करपत असलेल्या रोपांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे .सध्याचे वातावरण हे महाराष्ट्रात मान्सून पुढे ढकलण्यासाठी अनुकूल असल्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे लवकरच पाऊस सुरू होईल. असं हवामान खात्याने म्हटले आहे.
27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जरी
कोल्हापूर सातारा नाशिक या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तिन्ही जिल्ह्यात घाट परिसरात असल्यामुळे अधिक पावसाची शक्यता आहे पुढचे दोन दिवस तिथे येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . हवामान खात्याने 27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येणार असल्याची माहिती वर्तवली आहे.
पावसामुळे रोपांना काही प्रमाणात दिलासा
कालपासून नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तिकडचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे कारण इथल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती व कडक उन्हामुळे पीक करपत असल्याचे पाहून शेतकरी चिंतेत होते कालच्या पावसामुळे रोपांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे
मुंबई ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता
सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस झाला आहे याचा मुंबईकरांना चांगला फायदा झाला आहे कारण वातावरणात गारवा निर्माण झाला असून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे व पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे रिमझिम पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे पुणे शहरात सगळीकडे ढगाळ वातावरण आहे महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यास सध्या परिस्थिती अनुकूल आहे.