Maharashtra Day : दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने राज्यातील अनेक बाजारसमित्यांमधील व्यवहार सुटीमुळे बंद राहणार आहेत, असे बाजारसमित्यांमार्फत कळविण्यात आले आहे. या काळात भुसार माल तसेच भाजीपाला आणि फळे यांचे व्यवहार होऊ शकणार नाहीत. तसेच आज दिनांक २९ रोजी अनेक बाजारसमित्यांना अक्षय्य तृतीयेच्या सणाची सुटी आहे. तर नाशिक जिल्ह्यातील काही बाजारसमित्या केवळ सकाळच्या सत्रातच सुरू राहणार असल्याचे समजते.
कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत उप कार्यालय सायखेडा यांनी कळविले आहे की व्यापारी अर्जानुसार आजबुधवार दिनांक 30.04.2025 रोजी कांदा लिलाव बंद राहतील व गुरुवार दिनांक
1 मे महाराष्ट्र दिन असल्याने सायखेडा सबयार्ड वरील कांदा लिलाव बंद राहतील. दुसरीकडे लासलगाव आणि उपबाजार असलेल्या निफाड बाजारात अक्षय्य तृतीयेला सकाळच्या सत्रात कांदा लिलाव सुरू राहणार असल्याचे संबंधित बाजार समितीने कळवले आहे. मात्र दुपारच्या सत्रात लिलावांना सुटी असून दिनांक १ मे रोजीही संपूर्ण बाजारसमितीला सुटी असणार आहे.
दरम्यान शुक्रवार दिनांक २ मे पासून राज्यातील बाजारसमित्यांमधील लिलाव आणि व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याचे बाजारसमित्यांच्या व्यवस्थापनाने कळवले आहे. नाशिक जिल्ह्यात आज ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेनिमित्त कांदा व्यवहार सकाळच्या वेळेस सुरू राहणार असून अनेक ठिकाणी मुहूर्ताची कांदा खरेदी होणार आहे. तसेच अनेक व्यापारी कांदा चाळीच्या साठवणुकीसाठी कांदा खरेदी करतील. त्यामुळे आज कांदा काहीसा वधारलेला असेल, असे सांगण्यात येत आहे.












