Corn rate : पोल्ट्री उद्योगामध्ये आणि इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर ,दर वाढण्याची शक्यता …

केंद्राने इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. सध्या मक्याची उपलब्धता कमी झाल्याने पोल्ट्री उद्योगाने मक्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सुरुवातीला साखरेचे उत्पादन कमी असल्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी १७ लाख टन साखरेची मर्यादा सरकारने निश्चित केली आहे. इथेनॉल उत्पादन करण्यासाठी मक्याचा वापर जास्त प्रमाणात करावा तसेच इथेनॉल मिश्रणाचे १५ टक्के उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे. भारतामध्ये मक्याच्या दरात ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेमध्ये जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत २० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. परंतु पाहिजे तेवढी मका उपलब्ध नाही असे चित्र दिसत आहे.

मका आणि इतर धान्यांपासून तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉलची खरेदी किंमत ५.७९ रुपयांनी वाढवली असून ७१.८६ रुपये प्रतिलिटर केली आहे. केंद्राने मक्याचे प्रमाण अजून जाहीर केले नसले तरी , उत्पादित मक्यापैकी १० ते २० टक्के मका इथेनॉल उत्पादनाकडे वळवला जाऊ शकतो,असा पोल्ट्री उद्योगाचा अंदाज आहे . यामुळे मागणी-पुरवठ्यातील फरक वाढू शकतो .

त्यामुळे मक्याची उपलब्धता कमी होऊ शकते . मक्याचे भाव २५ रुपये प्रतिकिलोवरून ३० रुपये प्रतिकिलोवर पुरवठा कमी झाल्यामुळे जाऊ शकतात. नॉन-जेनेटिकली मॉडिफाइड (GM) मका आयातीस सरकारने परवानगी दिली आहे, नॉन-जेनेटिकली मॉडिफाइड (GM) मका उत्पादन केवळ काही देशच करत आहेत . या व्यतिरिक्त मक्यावर ५०-५५ टक्के आयात शुल्क लावण्यात येते . सरकारने जीएम मका आयातीची परवानगी द्यावी आणि मकावरचे आयात शुल्क माफ करावे अशी मागणी पोल्ट्री उद्योगाने केली आहे.

२० लाख हेक्टरहून अधिक पेरणी

सध्या मक्याची पेरणी २० लाख हेक्टरहून अधिक झाली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये , महाराष्ट्र ,मध्य प्रदेश,कर्नाटक बिहार, तेलंगणा,तमिळनाडू, आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.इथेनॉलसाठी मागणी वाढत असल्या कारणामुळे भारताने पुढील पाच वर्षांमध्ये १० दशलक्ष टनांनी मका उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पोल्ट्री उद्योगातून तसेच इथेनॉल साठी सातत्याने मागणी वाढत आहे. यामुळे मक्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply