मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळपिकांची मध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यासह ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक वातावरण आहे . अशा वातावरणामध्ये फळ गळणे, डेट सुखी, पानावरील डाग ,पान गळणे फळावरील तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत, बुरशीची वाढ होऊ शकते.
यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असते . बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय घेतली पाहिजे काळजी पाहूया आमच्या या लेखामध्ये विशेषतः मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळा पिकांमध्ये पानावर पिवळे डाग पडणे फळाच्या देठाच्या शेजारी पिवळे पणा येणे आणि कंटिन्यू फळगळ सुरू होणारा हा प्रकार पाहायला मिळतो .
त्याला आपण बुरशीमुळे झालेली पानगळ दुसरे महत्त्वाचे फायटोफ्थोरा निकोशियानी व फायटोफ्थोरा पाल्मिव्होरा हे दोन बुरशीचे प्रकार आहे. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे मोसंबी पिकाचे नुकसान चालू आहे. साधारणपणे लिंबूवर्गीय पिकामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र पाहायला मिळतो .विशेषता फळगळीच्या लक्षणांमध्ये जसे वातावरण बदलते , ढगाळ वातावरण, पाणी साचून राहणे आणि पावसाचे परिणाम यामुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर फायटोफ्थोरा चा प्रादुर्भाव , सर्वत्र पाहायला मिळतो. ही जी बुरशी आहे ती मुळाद्वारे विशेषता जास्त प्रमाणात शिरकाव करते .
या बुरशीचे फळ जे जमिनीवर पडलेले आहेत . त्याच्यावर पाण्याचा थेंब पडून हवामानामुळे याचा प्रादुर्भाव सुरू होतो . पावसाळ्यामध्ये जमिनीलगत फांद्यांवरील पाणी आणि फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रभाव सर्वप्रथम होतो. यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी होतात. ही पाने हातात घेऊन चुरगळल्याचा प्रयत्न केल्यास त्याची घडी होते. मात्र ही पाने फाटत नाही टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर पसरून पाने तपकिरी आणि काळे होतात. त्यानंतर ही पाने गळून त्यांच्या झाडाखाली खच पडतो.
ही काळजी घ्या
बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते हे पाणी शेताच्या उताराच्या बाजूने बाहेर काढावे.
झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट लावावी. रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यास त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढवून तीव्र होतो.
फायटोफ्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळांवरील तपकिरी कुज ब्राऊन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील एक.एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50 डब्ल्यूपी 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी. त्यामुळे खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवर बुरशी आणि तिच्या सक्रिय विजाणूंच्या नायनाट होण्यास मदत होईल,