राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.सगळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असताना भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून पाच सप्टेंबर नंतर मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. पावसाने राज्यात गेल्या काही दिवसापासून ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन देखील राज्यात काही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. तसेच काही जिल्ह्यांमध्ये जनावरांना चारा, पिके, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे . त्यामुळे मोसमी पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला.
कोकणामध्ये शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. कोकणातील काही भागांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडतील . सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यात हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या जिल्ह्यामधील काही भागांमध्ये तुरळक पाऊस बरसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
यवतमाळ मध्ये पावसाची हजेरी
मागील 17 दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दंडी मारली होती. त्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. परंतु रविवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली काही ठिकाणी कुठे तूरळक काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
नागपूर अमरावती यवतमाळ अकोला चंद्रपूर ,वाशिम, बुलढाण्यात पावसाची शक्यता आहे. मराठवाडा भागात हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, संभाजीनगरचा काही भाग लातूर ,धाराशिव या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे भागात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्र मध्ये अहमदनगर आणि नाशिक पिंपळनेर च्या बऱ्याचश्या भागातील देखील पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र मध्ये पाऊस फक्त जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पडेल
हिंगोली शहर सह ग्रामीण भागामध्ये पाऊस
रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये विजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या अनेक दिवसांनी पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी कोमजली होती. पण या पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा संकट उडवला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यभरात पावसाची प्रतीक्षा होत आहे.