यंदाच्या खरीप हंगामामध्ये देशातले पहिले द्रव रूपातील नॅनो डीएपी खत बाजारात उपलब्ध करण्यात आलेले आहे . नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपीच्या पोत्यामागे शेतकऱ्यांचे 750 रुपये वाचवणार आहे.
डीएपी हे बॅगेच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध असले तरी 50 किलो ची बॅग जमिनीत पाण्याच्या पुढे टाकायची असते. परंतु नॅनो डीएपी चे तंत्रज्ञानात डीएपी पाण्यात मिसळून केलेले द्रावण हे झाडांवर फवारायचे आहे.
नॅनो डीएपी एक लिटर पाण्यामध्ये पाच मिली या प्रमाणात टाकावे .हे द्रावण झाडांच्या पानांवर पडल्यामुळे झाडांनी हे द्रावण शोषून घेतल्यामुळे यामधून परिणामकारक रिझल्ट दिसून येत आहे. कारण जमिनीत टाकलेली डीएपी हा पाणी भरल्यानंतर विरघळून मुळांद्वारे झाडांना मिळत असतो. परंतु झाडांच्या मुळांची कार्यक्षमता जर कमकुवत असेल तर जमिनीत टाकलेला डीएपी हा विरघळून जमिनीत मुळांच्या कार्यकक्षबाहेर खालच्या थराला निघून जातो.
यामुळे शेतकऱ्यांची नुकसान होत असते . परंतु नॅनो डीएपीचा वापर केल्यामुळे पुन्हा जमिनीतून बल्क स्वरूपातील देण्याची गरज नाही . या खरीप हंगामात नॅनो डीएपी दाखल झाले असून आता पहिल्यांदाच शेतकऱ्यांना अनुभवता येईल
पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी डीएपी मध्ये स्फुरद, नत्र, पालाश ,हे तीन घटक असतात. यामुळे डीएपी खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर होते.त्याचे बजेट जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडते .यंदा प्रथमच नॅनो डीएपी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे . डीएपी 1350 रुपयांची खताची बॅग मिळत असते परंतु आता नॅनो डीएपी हे 600 रुपये यामध्ये लिक्विड बॉटलमध्ये उपलब्ध होणार असून डीपीच्या पोत्यामागे 750 रुपये आता शेतकऱ्यांची वाचणार आहेत.