नारायणगाव मधील उपबाजारात टोमॅटो दरात सुधारणा.

कृषिमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांना पेरणीआधी सरकार १० हजार देण्याच्या तयारीत.

नायगाव येथील उपबाजारामध्ये टोमॅटो, कोथंबीर ,शेपू या बाजारभावामध्ये मागील दोन दिवसांमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  दिनांक.10 झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते साडेचारशे रुपये दर मिळालेला आहे. 

कोथिंबीर जोडीला प्रतवारीनुसार शेकडा 200 ते साडेतीन हजार रुपये बाजार भाव मिळालेला आहे.  उपबाजारामध्ये शनिवारी आंबेगाव, जुन्नर ,संगमनेर, शिरूर ,पारनेर या भागामधून 45000 टोमॅटो क्रेटची ( प्रति क्रेट 20 किलोग्रॅम) आवक झाली आहे मागील सहा महिन्यापासून प्रथमच टोमॅटोला बाजार भाव चांगला मिळालेला आहे असे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी माहिती  दिली .

मागील वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करण्यात आली होती.  टोमॅटोचा हंगाम मार्च महिन्यात सुरू होतो.  परंतु यावर्षी तापमान वाढ झाल्यामुळे टमाटर ची प्रतवारी वर परिणाम झालेला आहे मार्च ते मे दरम्यान टोमॅटोचे बाजार भाव कमी झाले होते

याचाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे शेतकरी नाराज होते. त्यादरम्यान 24 मे रोजी शेतकऱ्यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकून आंदोलन केले होते. मात्र मागील चार-पाच दिवसापासून  तापमानात घट झाली असल्यामुळे इतर राज्यांमध्ये टोमॅटोला मागणी वाढलेली आहे. 

नायगाव बाजारातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री केली जात आहे . व्यापाऱ्यांची संख्या बाजार समितीच्या आवारात वाढलेली असून आवक सुद्धा स्थिर असून देखील टोमॅटो च्या बाजारभावात वाढ झालेली आहे. 

हीच परिस्थिती कोथिंबीर आणि मेथी शेपू यांच्या बाजारभावामध्ये दिसून आली कोथिंबीर, शेपू ,मेथी दोन लाख 27 हजार 700 जोड्यांची आवक झालेली आहे ,कोथिंबीर जोडीला शेकडा दोनशे रुपये ते साडेतीन हजार रुपये तर मेथी जोडीला 551 रुपये ते 2400 रुपये तर शेपूच्या जोडीला शेकडा 700 रुपये ते 800 रुपये भाव मिळालेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *