National level award : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार..

National level award : मराठवाड्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे (FSRDA) राष्ट्रीय पातळीवरील उकृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाले. हे सर्व शेतकरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राद्वारे नियमित मार्गदर्शन घेतात. सदरील पुरस्कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेच्या समारोप समारंभात दिनांक ९ मार्च रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

या पुरस्कारामध्ये प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा), श्री. ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी), श्री. जनार्धन आवरगंड (माखणी, ता. पूर्णा), आणि श्री. रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा), यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार यांचा समावेश आहे.

कार्यक्रमात कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांचे आणि अभिनंदन केले. यावेळी मार्गदर्शनात म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा आर्थिक नफा अधिक मिळण्यासाठी हवामान अनुकूल वाणांचा विकास होणे आवश्यक आहे. याबरोबरच कमी सिंचनावर येणारे, कमीत कमी निविष्ठांचा वापर करून अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करून लागवडीवरील खर्चात बचत करावा लागेल.

शास्वत शेतीसाठी शेततळे विकास, सोलार उर्जा आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर या त्रीसूत्री तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने याच धर्तीवर संशोधन विकसित केले असून विद्यापीठाचा तुरीचा गोदावरी या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचन वर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो. शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळते. शेतकऱ्यांनी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे आणि शेतकऱ्यांना साधारणपणे एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास प्राप्त होत आहेत असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात परभणी विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, श्री शरद चेनलवाड, श्री. अर्जुन जाधव, प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब हिगे आणि श्री. सुरेश शृंगारपुतळे तसेच महिला प्रगतशील शेतकरी श्रीमती सुषमा देव (हदगाव, जि. नांदेड), श्रीमती सरीताताई बाराते (मानवत, जि. परभणी), श्रीमती वंदना जोगदंडे (सिल्लोड, जि. नांदेड) यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *