लवकर पेरणी झालेले सोयाबीन बाजारपेठेमध्ये अनंत चतुर्थीच्या आधी आले आहे. यावर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरिपाच्या पिकांनी शिवार बहरला आहे.
दरम्यान, खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे दरातही ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी घरातील जुने सोयाबीनही बाजारात आणले आहे त्यामुळे , पुन्हा दरात घसरण होईल, या भीतीने त्याची विक्री सुरू केली आहे.
३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक १५ सप्टेंबर रोजी औशातील अडत बाजारपेठेत झाली. यामध्ये नवीन सोयाबीन १०० क्विंटल आले आहे.परजिल्ह्यासह कर्नाटकाच्या सीमा भागातील शेतकरी शेतमाल घेऊन येत आहेत.
दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये येथील अडत बाजारपेठेत सोयाबीनची आवक होते. पावसाने साथ दिल्यास पुढील आठवड्यात नवीन सोयाबीनची आवक जास्त प्रमाणात वाढेल, असे बाजार पेठेचे सचिव संतोष हुच्चे यांनी सांगितले.
चार लाख तेरा हजार १७५ क्विंटल सोयाबीनची आवक गेल्या वर्षी झाली होती.या बाजारपेठेत बारा महिने थोड्याफार प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू असते.रविवारी सोयाबीनला कमाल ४ हजार ७६५, किमान ४ हजार ३००, तर साधारण ४ हजार ६४४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या वर्षी सोयाबीनची गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.सोयाबीनचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोयाबीनचा ९३ हजार हेक्टरवर पेरा..
वेळोवेळी पाऊस झाल्यामुळे पीकही जोमात आले आहे , उत्पन्नवाढीची आशा आहे. सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने उघडीप द्यावी. एकूण खरिपाच्या पेरणी क्षेत्रापैकी ९३ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये सोयाबीनचा पेरा औसा तालुक्यात झाला आहे.
काढणीसाठी पिशवीला ५ हजारांचा दर..
गेल्या वर्षी सोयाबीनला चार हजार ते चार हजार पाचशे रुपये दर मिळाला होता तर या वर्षी तो ५ हजारांच्या पुढे गेला. सोयाबीनचा दर सहा हजारांपर्यंतही थोडाफार पाऊस झाल्यास जाऊ शकतो. मजुरांचा भावही सोयाबीनच्या नवीन हंगामाचा श्रीगणेशा होताच वाढला आहे. शेतकऱ्यांशी महिन्यांपूर्वीच काढणीचा ठराव काही मजुरांनी केला आहे.