शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना मदत म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांना कमी पीक कर्ज देणाऱ्या बँकांना नोटीस पाठवलेल्या आहेत . खरीप पिक कर्ज उद्दिष्टांच्या 57% पीककर्ज अमरावती मध्ये वितरण झाले आहे.
ज्या बँका 20 टक्के पेक्षा कमी कर्ज वाटप करत आहेत अशा बँकांना ‘कारणे दाखवा ‘ अशी नोटीस पाठवून कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी देतात . खरीप हंगामासाठी सरकारने एक हजार चारशे पन्नास कोटी पीक कर्जाची उद्दिष्ट ठरवले आहे. यामध्ये 89% जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा आहे.
राष्ट्रीय व खाजगी बँकांची कामगिरी योग्य प्रकारे नाही त्यामुळे त्यामध्ये त्वरित सुधारणा करून येथे पंधरा दिवसात जास्तीत जास्त कर्ज वितरण करून उद्दिष्टे पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले . त्यामुळे याकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे.
शेतकऱ्यांना खूप सार्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे संवेदनशीलता बाळगून त्यांना कर्ज मिळवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आव्हान देखील त्यांनी केले . त्यामुळे बँक आता धर्माची भूमिका घेणार का असे प्रश्न सगळ्यांना पडला आहे.