आता ताणापासून मिळेल धन,पहा सविस्तर ..

शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवत झाले असेल त्या गवतापासून तुमच्या मुख्य पिकाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल. तर गवता विषयी तुम्ही ज्या ज्या गोष्टी वापरतात म्हणजे राऊंड, ग्रामोक्झोन , शीतपावर , वेगळ्या प्रकारचे तन नाशक वापरू नही या तणांचा बंदोबस्त योग्य पद्धतीने होत नसेल तर तुमचं डोकं फिरणार शंभर टक्के फिरणार तर यामध्ये डोकं फिरण्या पेक्षा जरा आपण याच्यामध्ये खोलात जाऊन विचार केला की जस दोन प्रकारचे माणसे राहतात . एक चांगली माणसे तर एक वाईट माणसे तसे दोन प्रकारच्या बुरशीचा राहता . एक चांगली बुरशी , व एक वाईट बुरशी ,चांगली बुरशा म्हणजे कोणत्या ट्रायकोडर्मा ,मायकोरायझा ,या सारख्या चांगल्या बुरशा , वाईट बुरशा डार्विस ,डायबेज तर या वाईट बुरशा ,दोन्ही बुरशाच आहे,तसेच दोन्ही माणसाचे आहें . त्याचं पद्धतीने गवताचे सुद्धा दोन प्रकार आहेत आपली जुनी म्हण आहे ना तन देई धन . त्या तन देई धन , त्याच तना पासून धन कसं मिळवायचं . ते आपण आज या लेख मध्ये तुम्हाला सांगणार आहे.

 माहिती अत्यंत नवीन आहे तुमच्यासाठी . नवीन माहिती आम्ही शास्त्रीय पद्धतीने सर्वगोष्टी समजून सांगतो  .तर सर्वात पहिला पॉईंट तना पासून धन मिळवण्याचा अनोखा पर्याय. तर आपल्याला त्या आधी ताणाचे दोन प्रकार माहिती पाहिजे .आता तनाचे भरपूर प्रकार येतात एक-दोन प्रकार नाही तनाचे भरपूर प्रकार येतात . गावताचे भरपूर प्रकार आहें. हरळ ( दुर्वा ),गास ,नागर मोथा ,तर या पद्धतीने भरपूर प्रकारचे गवत येतात दूधही वगैरे. तर या गवतांच्या प्रकारा पेक्षा आपल्याला जे इथे लागत आहे . ते दोन मुख्य प्रकार जे आहे ते म्हणजे एक आपल देशी गवत म्हणजे आपल्याला गावठी गवत सुद्धा म्हणू शकतो . आपल्या देशाचे पूर्व काळापासून आलेले जे गवत होत ते , अनेक विदेशी गवत . विदेशी गवत म्हणजे काय ? विदेशी गवत म्हणजे जे आपण फर्टीलाझर इम्पोर्ट केली DAP म्हणा ,१० २६ २६,,12 32 16 चे बाहेरच्या देशांमधून जे खत येतात त्या खतांसोबत तिथल्या गवताचे बियाणे सुद्धा आपल्या देशात आले आहेत , आणि त्या बियांचा प्रसार आपल्या देशामध्ये इतका झाला कि आज आपल्याला 99 टक्के विदेशी गावात दिसते . आणि या विदेशी गवताणे आपल्या देशी गवताना संपल्यामुळे १ % देशी गवत दिसते .ज्या विदेशी गवताचे सुद्धा आता कोणाला नॉलेज सुद्धा राहिलेलं नाही आणि हा विषय सुद्धा आहे हे सुद्धा माहिती नाही.

तरी ही विदेशी गवत इतके घातक आहे, त्यांनी देशी गवताला संपवलं आणि आता गवताचा समज असा झालाय की गवत फक्त धन खायचं काम करत द्यायचे करत नाही. तर पूर्वजांनी जि म्हण बनवली, तन देई धन ती खोटी आहे का तर अजि बात नाही . आज पर्यंत जेवढे म्हणी पूर्वजांनी बनविले शंभर टक्के खरे आहेत पण हि जी म्हण आहे, ती लागू का होत नाही . तर या मॅटर मुळे विदेशी गवतामुळे. तर आता या गोष्टी कशा घडल्या तर आपण पाहिलं, की फर्टीलायझर ,डेपी थुरु किंवा बाकीच्या खादीमधून तुम्हाला विदेशी गवतांच बी आले आहे. तर आता हे संपवायचं कसं कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे. तर जस आपण काट्याने काटा काढतो ,लोखंडाने लोखंड कापतो तर आपण म्हणतो काट्याने काटा काढयाला पाहिजे . तर त्याच पद्धतीने गवतनि गवताला संपवले पाहिजे. तर तेच गवत म्हणजे तुमचे देशी गवंतानीच विदेशी
गवताला संपवता येऊ शकते . आणि आणखी एक महत्वाचा मुद्यांची गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणताल गवत वाढून आपण गवताला संपू, पण त्या गवताणें आपलं नुकसान आहे त्याचं काय . तर एक गोष्ट लक्षात घ्या आपली जुन्या काळातली ती देशी गवत होती ती आपल्याला नुकसान करत नव्हती .

जास्त प्रमाणात त्यांच्या कडून नुकसान होत नव्हतं. बहुतेक प्रकार असे सुद्धा होते ते गवता मध्ये बहुतेकदा आयुर्वेदिक सुद्धा होती . त्यांचे महत्त्व आपल्याला माहिती आहे. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या याचा पुरावा सुद्धा लागेल. पुराव्यानुसार सांगायचं ठरलं तर लक्षात घ्या तुम्ही जेव्हा विदेशी बागायती पाहतात . विदेशी डाळिंबाची बाग विदेशी, संत्र्याची बाग , विदेशी कारलाची बाग,विदेशी भोपळ्याची बाग या बागे मध्ये तुम्ही खालच्या बाजूला एकदम हिरवं -हिरवं फोटोमध्ये पाहत असता . अजूनही तुम्ही गुगल करू शकतात ऑस्ट्रेलियामध्ये डाळिंबाची बाग पहा

किंवा कुठली बाग तुम्ही पाहिली तर तुम्हाला तर बागायतीमध्ये जमिनीवर लॉन सारखं हिरवं गवत दिसेल. तर तिथे एक गोष्ट लक्षात घ्या आणि आपल्या कडे जर पाहिले तर आपण आपली जमीन काळीभोर ठेवण्याचा प्रयत्न करतो . कारण हेच गवत भरपूर घातक आहें .आपण न्यूट्रिशन खेचत राहतो . तर मुद्दा काय
मुद्दा लक्षात घ्या की आपल्या बागांमध्ये जर गवत दिसलं तर दहा प्रकारचे गवत दिसत आहेत आपण रियालिटी मध्ये सुद्धा पाहतो . पण विदेशी फोटोतुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं जाणवलं की तिथे फक्त एकच प्रकारचा लॉन सारखा गवत दिसतंय . हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर गोष्टीमध्ये लक्षात घ्या येथे आपल्याला काय करायचे . गवताने गवताला संपायचे आहे. त्यासाठी गवता वर हर्बीसाईड वापरून त्याचा रिझल्ट भेटत नाही. आता केमिकलचा सुद्धा रिझल्ट राहिलेला नाहीये आता काही काळाने फक्त आपण पाणी फवारणार आहे. व पैसे मोजणार आहे. या गोष्टी करण्या पेक्षा आता भविष्यकाळ येण्याच्या आधीच आपल्याला

भूतकाळात मध्ये काहीतरी उपाययोजना कराव्या लागता . तर त्या उपाययोजना साठी आपण अशा प्रकारचे गवत निवडण्याचे ठरवलं जे वाढवल्या नंतर बाकीचे सगळ्या प्रकारचे तुमचं विदेशी गवत असो . किंवा कुठल्याही प्रकारचे गवत असो ते आपण संपून टाकू आणि आपण ज्या गवताची निवड करणार आहे त्याने आपल्या मुख्य पिकाला कुठल्या प्रकारचा धोका पोहोचला नाही पाहिजे . यांनी फायदा-तोटा काय होणार आहे त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात . आपण जी पहिली गवताची निवड केली त्या गवताची मुळी दोन इंचाचा खाली वाढता कामा नये . ही गोष्ट पहिली अट आपण त्या गावांमध्ये टाकली जे गवताची आपण निवड करणार आहे. . याचा अर्थ काय न्यूट्रिशन आहे . ते फक्त वरच्या दोन इंचाच्या थरां मधून त्या गवताने उचलला पाहिजे . अति खाली जायची तुला गरज नाही कारण खाली आमची ही मुख्यपिके पिकाची कक्षा आहे . तिथे आमचे मुख्य वर्ग वाढते त्यामुळे तेथे तुला जाण्याची परवागी नाही कारण तिथे न्यूट्रिशन आमच्या झाडालाच पाहिजे ठीक आहे .तरी अशा गवताचे आपण निवड केली पाहिजे .. त्यानंतर तुमची जी गवताची निवड असेल त्या गावताची पाने एकदम घनदाट असता काम नये घनदाट का बर नाही? जर असले तर त्यामध्ये कीटक लपण्याच्या भरपूर मोठा चान्स राहतो जर तीची सुटसुटीत कॅनोपी असली तर आपले कीटकनाशक सुद्धा बारकाईने घुसत असले

तर शंभर टक्के त्या मध्ये कुठल्या प्रकारचे कीटक लपणार नाही.  आणि आपल्या मुख्य पिकास सुद्धा धोका पोहोचणार नाही . आता याचा फायदा काय आणि करायचं काय ? आपण काय करायचं की आपली जेव्हा मशागत होईल किंवा आपण जे तन नाशक मारू त्यावेळेस बहुतेक प्रकारात तुमची गवत संपून जाते या पिकाची गवताचे जे बी आहे ते गोळा करून घ्यायचं आणि तेच आपल्या शेतामध्ये टाकायचे फायदा असा आहे. त्याची मुळे खोल जात असल्यामुळे तुमच्या मुख्य पिकाला याचा कुठलाही धोकानाही आणि या पिकास जर पोपुलेशन वाढलं संख्या वाढली तर ते दुसऱ्या गवताना वाढू देत नाही. हे खूप महत्त्वाचे पॉईंट असल्यामुळे या पानांना तर तुम्ही  जमिनीत मिसळून त्याचा हिरवळीच्या खतांचा प्रकार तयार होतो . चौथी गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन सुद्धा जास्त ओढत नाही.  हिरवळीचे खत देखील यामुळे तयार होते.  आणि तुमचे विदेशी गवताचा सुद्धा नाश होत आहे.  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही रासायनिक खते वापरत आहात त्याच्यामुळे जे जमिनीवर दुष्परिणाम होत आहेत ते कमी होण्यास मदत होणार आहे . एक ऑरगॅनिक फार्मिंग च्या पद्धतीने तुम्ही जाण्यास वाटचाल सुरू करू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *