सुरुवातीला महत्त्वाची बातमी नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेत, आक्रमक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत , चांदवड, लासलगाव, पिंपळगाव, येवल्या मध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. नाफेडच्या अधिकारी उपस्थित नसल्याने हे लिलाव बंद पाडण्यात आलेले आहेत .
नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारती पवार यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली होती त्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते कि गुरुवारी लिलाव सुरू होतील.
मात्र नाफेडचे अधिकारी जे आहेत त्यांच्या मार्फत देखील या ठिकाणी 2410 रुपये जो भाव ठरलेला आहे. त्या भावाच्या वर खरेदी केली जाईल किमान 2410 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळेल अशापद्धतीचा आश्वासन या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ज्या वेळेला लिलाव सुरु झाले त्यावेळेला शेतकऱ्यांना २००० ते 2100 असे भाव मिळाला लागले आणि त्यामुळे संतप्त शेतकरी तसेच माजी आमदार यांनी हे लिलाव जे आहेत ते पूर्णपणे बंद पाडले आहेत.
फक्त चांदवड नाही तर लासलगाव , पिंपळगाव या बाजार समितीच्या अत्यंत मोठ्याबाजार समिती समजल्या जातात. लासलगाव बाजारसमिती मधून गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद होते. मात्र लिलाव सुरू झाल्यानंतर पाहिजे तसा बाजारभाव या ठिकाणी चांगल्या कांद्याला मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत
या ठिकाणी नाफेड जो आहे तो स्वतः खरेदीला उतरला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी लालासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव असेल त्यानंतर चांदवड समित्यांमधील लिलाव बंद पाडले आहेत .
गेली तीन महिने उन्हाळी कांदा दरामध्ये कुठलीही सुधारणा नव्हती; मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरात सुधारणा दिसून आली. अशातच ग्राहक हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारात आणला.नंतरच्या टप्प्यात ४० टक्के निर्यातशुल्क लादले त्यामुळे शेतकरी शेतकरी संघटना व व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा दावा केंद्र सरकारने केला.
सरकारने दोन लाख क्विंटल कांदा 2410 रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी करण्याची घोषणा केली त्यासाठी ही खरेदी जिल्ह्यातील बाजार समिती उप बाजार आवारामध्ये करण्यात यावी अशी शेतकरी वर्ग कडून मागणी होती परंतु असे असताना लिलाव सुरू झाल्यानंतर पहिल्या सत्रात जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी नाफेड व एनसीसीएफचे खरेदीदार नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची चौकशी केली त्यातच व्यापारी बोली लावू लागले व दरात घसरण दिसून आल्यावर शेतकऱ्यांनी संतापून आक्रमक भूमिका घेतली व पिंपळगाव बसवंत, लालसगाव येवला कळवळ अशा ठिकाणी पहिल्या सत्रातील लिलाव बंद पाडले.