kanda market : राज्यात या बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक सरासरी दर..

kanda market : आज दिनांक ३ जुलै रोजी खेड चाकण बाजारसमितीत सकाळच्या सत्रातील लिलावामध्ये कांद्याला सरासरी १५०० रुपये बाजारभाव मिळाला, तर पुणे मोशी बाजारात १४०० आणि सांगलीच्या बाजारात १३०० रुपये सरासरी बाजारभाव प्रति क्विंटल मिळाला.

दरम्यान दिनांक 2 जुलै 2025 रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची एकूण आवक 2,11,416 क्विंटल इतकी झाली असून या कांद्याला सरासरी दर 1325 रुपया प्रति क्विंटल इतका मिळाला. तर लाल (लोकल) कांद्याची एकूण आवक 16,004 क्विंटल इतकी असून त्याला सरासरी दर 1250 रुपया प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक नेवासा – घोडेगाव बाजार समितीत झाली. येथे काल दिवशी 25,696 क्विंटल कांद्याची नोंद झाली. दराच्या बाबतीत मनमाड बाजार समितीने आघाडी घेतली असून येथे उन्हाळ कांद्याला सर्वाधिक सरासरी दर 1600 रुपया प्रति क्विंटल मिळाला.

प्रमुख बाजार समित्यांमधील 2 जुलै रोजीचे कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे होते:

*लासलगाव
  उन्हाळ कांदा – 15,50 रुपये

*पिंपळगाव बसवंत:
  उन्हाळ कांदा – 1500 रुपये

* नाशिक:
  उन्हाळ कांदा – 950 रुपये

* पुणे:
  लोकल लाल कांदा – 1250 रुपया

* सोलापूर:
  लाल कांदा – 1100 रुपया

* राहुरी:
  उन्हाळ कांदा – 1600 रुपया

*छत्रपती संभाजीनगर:
  उन्हाळ कांदा – 950 रुपया

* नागपूर:
  लाल कांदा – 1450 रुपया

*सांगली:
  लोकल लाल कांदा – 1300 रुपया

* अहिल्यानगर (नेवासा):
  उन्हाळ कांदा – 1200 रुपया

वरील भाव सर्वसाधारण म्हणजेच सरासरी दर आहेत आणि प्रत्येक बाजार समितीतील कांद्याच्या प्रत, दर्जा आणि मागणीवर आधारित ठरवले जातात.

सध्या नाशिक व परिसरात उन्हाळ कांद्याची मोठी आवक असून येत्या काही दिवसांत दरावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला दर चांगले मिळत आहेत, मात्र अनेक ठिकाणी गुणवत्ता आणि साठवणूकक्षमता हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत.11:14 AM