
मागच्या आठवड्यापासून कांद्याचे दर वाढत आहेत . बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर ५ हजारांपर्यंत खाली आला होता.पुन्हा गुरुवारी हा दर साडेपाच हजारांवर पोहोचला आहे. व्यापाऱ्यांच्या मते येत्या दिवाळीपर्यंत वाढीव भाव कायम राहण्याची शक्यता आहे.
कांद्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभर असते. त्यामुळे पुणे,सातारा, सांगली, नाशिक अहमदनगर, जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील कलबुर्गी,विजयपूर, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात माल सोलापूर मार्केटमध्ये येत असतो .
शिवाय इतर बाजार समितीच्या तुलनेत सोलापुरात कांद्याला दरही कायमच चांगला मिळतो. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड सोलापूर जिल्ह्यामध्येही केली जाते.
सोलापूर जिल्ह्यातून नवीन कांदा साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत दर स्थिर राहणार आहे. आता निर्यात शुल्क केंद्र सरकारने कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दर वाढत आहे.
येत्या पुढील महिनाभर दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकातील पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे मागील ८ ते १० दिवसांपासून दर पाच हजारांच्या आसपासच आहे. सरासरी दरही ४ हजारांच्या घरात आहे. .
याशिवाय सातारा जिल्ह्यातील कांदाही मागील वर्षापासून सोलापूरला येत आहे. याशिवाय आता पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील जुना कांदा विक्रीला येत आहे.
डिसेंबरपासून मोठी आवक..
सोलापूर जिल्ह्यातील कांद्याची डिसेंबर महिन्यापासून आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यंदा लागवड क्षेत्र वाढले आहे त्यामुळे दर वर्षाच्या तुलनेमध्ये डिसेंबरपासून आवक वाढणार आहे. मकर संक्रांतीच्या काळात जानेवारी महिन्यात जवळपास १००० ट्रक कांद्याची आवक असते. त्यामुळे यार्डातील माल बाहेर काढण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात. त्यामुळे कांद्याची मोठी आवक तीन महिने राहणार आहे.
बुधवारी कांद्याची आवक वाढली होती. त्यामुळे दर ५०० रुपयांनी कमी झाला . गुरुवारी परत दर वाढला आहे. पुढचे काही दिवस दर स्थिर राहणार आहे. सध्या कर्नाटकातून व सातारा जिल्ह्यातील म्हसवड या ठिकाणावून नवीन माल येत आहे.नोव्हेंबर महिन्यानंतर सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांचा कांदा विक्रीला येईल.
नामदेव शेजाळ, कांदा विभागप्रमुख