
Kanda Bajarbhav : दिनांक २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख कांदा बाजारातील लाल आणि उन्हाळी कांद्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आज किमान २ हजार रुपये, तर सरासरी ३७०० रुपये असे आहेत. कालच्या तुलनेत या बाजारभावात तब्बल ९०० ते १३०० रुपयांची घसरण झाली आहे.
लाल कांद्याचे बाजारभाव लासलगावमध्ये आज किमान १५०० रुपये, तर सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल असे आहेत. काल दिनांक २२ नोव्हेंबरच्या तुलनेत आज सरासरी बाजारभाव ४०० रुपयांनी गडगडल्याचे चित्र आहे.
धाराशिव बाजारात लाल कांद्याच्या सरासरी बाजारभावात कालच्या तुलनेत ११०० रुपयांची घसरण होऊन सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.
दरम्यान आज सोलापूर बाजारसमितीत लाल कांद्याची आवक घटून ३१ हजार ७३० क्विंटल इतकी झाली. या ठिकाणी कांद्याचे किमान बाजारभाव २०० रुपयांनी घसरून केवळ ३०० रुपये प्रति क्विंटल इतके पाहायला मिळाले, तर सरासरी बाजारभाव २५०० रुपये प्रति क्विंटल असे राहिले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे बाजारभाव – (Sunday, 24 Nov, 2024)
शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा
अनु | कोड नं. | शेतिमाल | परिमाण | आवक | किमान | कमाल |
---|---|---|---|---|---|---|
1 | 1001 | कांदा | क्विंटल | 11859 | Rs. 2500/- | Rs. 6500/- |
2 | 1002 | बटाटा | क्विंटल | 11576 | Rs. 2200/- | Rs. 4200/- |
3 | 1003 | लसूण | क्विंटल | 872 | Rs. 20000/- | Rs. 35000/- |
4 | 1004 | आले | क्विंटल | 792 | Rs. 700/- | Rs. 7000/- |