हा आहे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार !

Youngest MLA of Maharashtra: सर्वात तरुण आमदार 
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात, सर्वात तरुण आमदाराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ २५ वर्षांच्या हा तरुण नेता राज्याच्या राजकारणात तरुणाईची ऊर्जा आणि नवीन दृष्टिकोनाचे प्रतीक बनला आहे.
 
लक्षवेधी लढत.
हा तरुण नेता म्हणजे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र, तासगाव – क.महांकाळ मतदार संघाचा नवीन आमदार रोहित पाटील हे आहेत. त्यांना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी विधानसभेची उमेदवारी मिळाली होती .आर. आर. पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. दरम्यान, यंदा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळाली त्यामध्ये रोहित पाटील यांनी 26832 मताने विजय मिळवला.
 
 
 
 
उपलब्धी आणि दृष्टिकोन 
दिवंगत आबांच्या विचारांचा झेंडा पुढे नेण्यासाठी मी आणि माझे कुटुंबीय गेली 9 वर्षे आबांच्या विचारांची पूर्तता करण्यासाठी आणि मतदारसंघात समृद्धी आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत..! विकासाचा जो दृष्टीकोन मी तुमच्यासमोर ठेवला आहे, तरुणांच्या रोजगारासाठी केलेले नियोजन, मतदारसंघाच्या विकासासाठी आखलेले आराखडे, कष्टकरी जनतेच्या समस्या सोडवण्याची भूमिका, पक्ष व पक्षाप्रती असलेली निष्ठा पुरोगामी विचार आणि मतदारसंघाचा शाश्वत विकास हेच आमचे उद्धिष्ट आहे..! असे रोहित पाटील त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
 
 
 
आव्हाने आणि भविष्यातील शक्यता 
सद्या रोहित पाटील हे अतिशय तरुण आमदार आहेत, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे ते सुपुत्र असल्यामुळे मतदार संघातील तसेच राज्यातील लोकांचे लक्ष आणी ज्यास्त अपेक्ष्या त्यांच्याकडे असणार आहेत . सद्याच चित्र पाहता राष्ट्रवादी (शरद पवार गट) हा पक्ष विरोधी पक्षात आसण्याची शक्यता आहे तेंव्हा मतदार संघात निधी आणने आणी विकास कामे करणे हे त्याना आव्हानात्मक असेल मात्र एक तरुण आमदार असल्यामुळे त्याना मतदारसंघ आणि राज्यात काम कारण्यासाठी खुप मोठा स्कोप आहे. 
 
#Youngest MLA of Maharashtra #Rohit Patil #रोहित पाटील  
 
 

Leave a Reply