देशामध्ये आता टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली असून ,आता टोमॅटो पाठोपाठ कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे .यामुळे यंदा डिसेंबर पर्यंत देशात कांदा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांंनी म्हटले आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात कांद्याचे किरकोळ किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचं स्पष्ट झाले आहे .कांद्याची 2022 मध्ये किरकोळ किंमती 35 .88 रुपये होती 2021 मध्ये ही किंमत 32 .52 रुपये तर 2022 मध्ये ही किंमत 28 रुपये प्रति किलो अशी होती. परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत .मात्र येत्या काही महिन्यांमध्ये भाव वाढण्याचे चित्र दिसत आहे.
सरकार एखादी गोष्ट बफर स्टॉक मध्ये का ठेवते
देशात जेव्हा जेव्हा दुष्काळ किंवा अन्नधान्याशी संबंधित कोणती समस्या येते .त्यावेळी नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोयी होऊ नये म्हणून सरकार बफर स्टॉकची व्यवस्था करत असते. जेव्हा जेव्हा देशावर संकट येते तेव्हा बफर स्टॉक चा वापर केला जातो .याशिवाय एखाद्या खाद्यपदार्थाच्या किमती गणनाला भेटल्या तर त्या किमती स्थिर ठेवण्यासाठी ही बफर स्टॉक ठेवला जातो. जेव्हा पुरवठा कमी असतो तेव्हा किमती वाढत असतात.
80 ते 100 रुपयापर्यंत पोहोचले टोमॅटोचे दर
देशभरात सर्वात आधी उष्णतेची लाट आणि त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे टमाटरच्या दरावर देखील परिणाम झाला आहे .पाऊस आणि अतिउष्णतेमुळे पीक वाया गेले असल्यामुळे टोमॅटोचे भाव हे 10 ते 20 रुपयावरून आता 80 ते 100 रुपये प्रति किलो वर गेले आहेत हवामानामुळे टोमॅटोशिवाय इतर भाज्यांचे दर देखील घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढले आहेत