घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा खर्च येतो .त्यातील 40% खर्च सरकार सबसिडीच्या माध्यमातून ग्राहकांना देत असते. फक्त 72 हजार रुपयांमध्ये सोलर पॅनल बसवल्यास पंचवीस वर्षापर्यंत विज बिल भरण्यापासून मुक्तता मिळते. लाईट गेली किंवा आली अशी कटकट देखील राहत नाही.
दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावल्यानंतर दहा तास दहा युनिट वीज निर्मिती होते . एका महिन्यामध्ये 300 युनिट वीज मिळते .दर महिन्याला शंभर युनिट वीज लागत असल्यास उरलेले 200 युनिट आपण विकून पैसे कमवू शकतो. एकदा बसवलेले सोलर पॅनल हे 25 वर्षांपर्यंत टिकते.
त्यासाठी येणारा मेंटेनन्स देखील परवडणार आहे. दहा वर्षांमध्ये एकदा वीस हजार रुपये खर्च करून बॅटरी बदलावी लागते .सोलर पॅनल मार्फत बनलेली वीज हि मोफत असते.
अतिरिक्त वीज सरकारला किंवा खाजगी कंपनीला विकता येते. त्यासाठी ‘आरएडीए’शी संपर्क करावा लागतो. प्रत्येक राज्याच्या राजधानीत तसेच प्रमुख शहरांमध्ये याची कार्यालय आहेत. ग्राहकांनी वीज विक्रीसाठी त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधावा असे आव्हान महावितरणकडून करण्यात आलेले आहे.
नवीन टेक्नॉलॉजी चे सोलर पॅनल
सहा ते आठ युनिट वीज निर्मितीसाठी दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवावे लागेल. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले पॅनल आहे. त्यामुळे दोन किलो वॅट साठी चार सोलर पॅनल पुरेसे होतात. सोलर ऊर्जेला चालना देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप योजना सुरू केली आहे.
अनुदानाची रक्कम किती
सरकारच्या अनुदानासाठी डिस्कॉम पॅनल मधील कोणताही ठेकेदार निवडून त्याच्याकडून सोलर पॅनल बसवावे लागते .रुफटॉप सोलर पॅनल तीन किलोवॅटपर्यंत बसवल्यास सरकारकडून 40% पर्यंत सबसिडी मिळते.दहा किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनलवर सरकारकडून 20 टक्के सबसिडी मिळते. त्यासाठी एमएसईबी’कडे अर्ज करावा. त्यानंतर नॅशनल पोर्टलवर अर्ज करावा .डिटेल्स सबमिट केल्यानंतर ठेकेदार निवड करावी .व त्यानंतर पुढील प्रक्रिया महावितरण करत असते .पहिले बिल अपलोड झाल्यावर 45 दिवसात सबसिडी मिळते.
अर्ज करताना या बाबी लक्षात ठेवा
नॅशनल पोर्टल उघडल्यावर पहिल्यांदा राज्य वीज वितरण कंपनी निवडा.
तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाकून मोबाईल नंबर व ईमेल टाका
मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. आणि फॉर्म नुसार ‘रूफटॉपसाठी अर्ज करा.
DISCOM च्या मंजुरीची प्रतीक्षा करा. नोंदणीकृत विक्रेत्यांकडून सोलर पॅनल बसून घ्या.
सोलर पॅनल बसवल्यानंतर त्याचे डिटेल्स सबमिट करा व नेट मीटर साठी अर्ज करा.
DISCOM द्वारे नेट मीटर लावल्यानंतर तपासणी होऊन ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
कमिशनिंग रिपोर्टनंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचे डिटेल्स, कॅन्सल चेक सबमिट करावा. त्यानंतर ४५ दिवसांत अनुदान मिळते.