
Onion rate : 📉 केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाचा गोंधळ गेल्या चार महिन्यांपासून कांद्याच्या दरात फारसा बदल न झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदीबाबत धरसोड धोरण अवलंबल्याने दरात चढ-उतार होत असून, शेवटी दर पुन्हा ‘जैसे थे’ स्थितीत परतले आहेत.
📊 बाजार समित्यांतील दरवाढ आणि घसरण लोणंद बाजार समितीत कांद्याचा दर २४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला होता, परंतु तीन दिवसांतच तब्बल ९०० रुपयांची घसरण झाली. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, लासलगाव आदी बाजार समित्यांमध्येही दर ९०० ते १५५० रुपयांच्या दरम्यान आहेत.
🚫 निर्यात खुली, पण अटींचा फटका केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली असली तरी ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४०% निर्यातशुल्क या अटींमुळे देशांतर्गत दरात फारसा फरक पडलेला नाही. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही.
😔 शेतकऱ्यांची निराशा आणि व्यापाऱ्यांची चिंता दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणला, पण लिलावादरम्यान दर घसरल्याने उत्साह मावळला. व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे