
Nafed Kanda Kharedi: नाशिकसह महाराष्ट्रभर सध्या कांद्याचे दर चढउताराचे चक्र सुरू असतानाच नाफेडने रब्बी हंगामातील कांदा खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र शासनाच्या मूल्य स्थिरीकरण निधी (PSF) अंतर्गत ही खरेदी आज सोमवार दिनांक १ जुलैपासून सुरू झाली असून, राज्यातील निवडक सहकारी संस्था व कृषी संस्था यांच्यामार्फत कांदा खरेदी केली जात आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात स्थैर्य येण्याची आणि दरवाढीची शक्यता व्यक्त होत आहे.
नाफेडच्या खरेदीसंदर्भात दोने दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली असून नाशिक येथील नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही खरेदी सुरू झाल्याचे समजत आहे.
यंदा नाफेडकडून एकूण ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी जवळपास प्रत्येकी १ लाख टन खरेदी महाराष्ट्रातूनच होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या दुसऱ्या प्रमुख संस्था एनसीसीएफमार्फत (NCCF) देखील १७ कृषी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी होण्याची शक्यता असून, बाजारात भाव वाढीचा सूर लागू शकतो.
नाफेडमार्फत सध्या खालील १२ सहकारी संस्थांकडून कांदा खरेदी सुरू आहे:
1. आंबेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, निमगाव, सासवड, पुणे – 7028155681
2. बाळासाहेब ठाकरे अष्टवड नांदगावची सहकारी संस्था, पिंपळगाव – 9665512051
3. कृषी औद्योगिक सहकारी संस्था, ओझर – 9881191246
4. देवी महिला सहकारी संस्था, नांदगाव – 8451947282
5. नाशिक कृषी महिला संस्था, नांदगाव – 7766977794
6. कमलिनी नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संस्था, पिंपळगाव – 8857855055
7. कृषी साक्षर महिला संस्था, भाजेफळ – 7588014187
8. भगवती सहकारी संस्था, विंचूर – 9337362527
9. अटल महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था, दिंडोरी – 8766512641
10. शेतकरी संघ संस्था, खडकाळा –
11. २ सखी फार्म प्रोसेसर्स को-ऑप, पिंपळगाव – 9970038152
याशिवाय, लवकरच नाफेडमार्फत आणखी *९ संस्थांना खरेदीचे काम दिले जाणार असल्याची माहिती नाफेडच्या सूत्रांनी आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची विक्री या अधिकृत खरेदी केंद्रांवरच करावी आणि अधिक माहिती व नोंदणीसाठी खालील लिंकवर भेट द्यावी:
https://www.epravaha.co.in/nafed
किंवा अधिकृत संकेतस्थळावर माहिती पाहावी:
https://www.nafed-india.com
केंद्र शासनाच्या हस्तक्षेपामुळे कांद्याच्या किमतीत काहीसा स्थैर्य येण्याची अपेक्षा आहे. बाजार समित्यांमध्ये सध्या दरात चढ-उतार सुरू असतानाच ही सरकारी खरेदी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.