![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/या-वर्षी-राज्यात-कांद्याची-पेरणी-10-15-कमी.webp)
गेल्या काही महिन्यांतील अनियमित पाऊस ,कमी जलसाठ्याची पातळी निर्यातीवर निर्बंध, यामुळे रब्बी कांद्याची पेरणी 10 ते 15 टक्क्यांनी घटली आहे. पेरणीचा कालावधी संपायला अजून काही दिवस बाकी आहेत. तरीही या हंगामात कांद्याच्या लागवड क्षेत्रात एकरी दहा ते पंधरा टक्के घट होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक या मुख्य कांदा उत्पादक राज्यांमध्ये रब्बी हिवाळी कांद्याची पेरणी 20 टक्के पर्यंत घसरली आहे . यामुळे मार्च एप्रिलच्या आसपास अन्नधान्य महागाई उच्च पातळीवर जाऊ शकते लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधी जेव्हा सरकारवर महागाई निर्यात नियंत्रणात ठेवण्याचा दबाव असेल त्यावेळी ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
सध्याच्या पेरणीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते तरीही रब्बी कांदा लागवडीखालील क्षेत्र मध्ये दहा टक्के घट होऊन हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के कांदा रब्बी हंगामात होतो या हंगामात उत्पादित केलेला कांदा जास्त काळ टिकतो. या कांद्याची टिकवण क्षमता खरीप कांद्याच्या तुलनेत सुमारे पाच ते सात महिने जास्त असते आणि मार्च ते सप्टेंबर या कालावधीत कांदा बाजारात उपलब्ध होतो. त्यामुळे मागणी पुरवठ्याची गती टिकून ठेवण्याची मोठी जबाबदारी रब्बी कांद्यावर असते.
प्रमुख कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये जलसाठेची पातळी सध्या अत्यंत कमी आहे रब्बी कांदा १२ ते १५ सिंचनाची गरज असते त्यामुळे सिंचनाची शक्यता कमी झाल्याने शेतकरी रब्बी गांधीची लागवड करण्यात त्यांना पसंती दाखवत आहेत असे भारतीय कृषी संशोधन परिषदेने म्हटले आहे.