![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/शेतसारा-ऑनलाइन-भरण्याची-सुविधा-उपलब्ध.webp)
पुणे महानगरपालिकेच्या मिळकतकराच्या धर्तीवरच आता जमीन विषयक महसूल कर अर्थात शेतसारा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे . भूमी अभिलेख विभागाने याची तयारी सुरू केली आहे अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली.
पुणे जिल्ह्यात सुमारे 19 गावे आहेत. त्यातील एक हजार पाचशे गावांमध्ये तलाठी स्तरावर ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे . आता पुढील टप्प्यांमध्ये लवकरच या गावांमध्ये शेतसारा भरण्याची ऑनलाईन नोटीस बजावली जाणार असून शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन कर भरता येणार आहे.
शेतसारा वसुलीसाठी तलाठ्यांना खातेदारांच्या घरी फिरावे लागत होते. तसेच या कराची वसुली वेळेवर होत नव्हती तसेच कर किती थकीत आहे, याची सुद्धा माहिती खातेदारांना नसते. या पार्श्वभूमीवर भुमिअभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या समितीमुळे सर्व्हे नंबरनिहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे. थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार आहे.
ई-चावडी या संगणक प्रणाली मध्येच भूमी अभिलेख विभागाने शेतीचा कर ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे.https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर शेतसारा भरता येणार आहे. शेतीचा कर भरण्याबरोबरच बिनशेती कर अर्थात ‘एनए’कर सुद्धा भरण्याचा पर्याय असेल.जिल्ह्यातील उर्वरित ४०० गावांमध्ये तलाठी स्तरावरून कर भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होईल, त्यादृष्टीने काम सुरू आहे.
वसुली मध्ये अडचणी
शेतीचा कर अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर वाढलेला दिसतो. थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या ऑनलाइन सातबारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयात सुद्धा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही.