उडीद व मूग या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर जास्त उत्पन्नासाठी शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. या मध्ये, रोग प्रतिकारक्षम, टपोरे दाणे असलेले व अधिक उत्पादन देणारा वाण कृषि विद्यापीठाद्वारे विकसित केलेले आहे.
१) बी डी यु-१
◼️ २००१ मध्ये हा वाण कृ.सं. कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथुन प्रसारीत करण्यात आला आहे.
◼️ हे वाण भुरी रोगास प्रतिकारक असून महाराष्ट्रासाठी शिफारस केली आहे.
दाणे हे मध्यम, काळया रंगाचे व टपोरे आहे तसेच १०० दाण्यांचे वजन ४.५ ते ५.० ग्रॅम एवढे असते.
◼️ या वाणांमध्ये प्रथिनाचे प्रमाण १९ टक्के इतके असून ७० ते ७५ दिवसांत काढणीस येते.
◼️ शेंगा या काळया व थोपडया असून त्यावर कमी प्रमाणात लव असतो.
◼️ या वाणाचे सरासरी उत्पादन ११-१२ क्विंटल प्रति हेक्टरी भेटते.
◼️ हे वाण मध्यम उंच वाढणारे असून पाने अरुंद व खोड जाभळ्या रंगाचे असते.
२) टी ए यु-१
◼️ हा वाण डॉ.प.दे.कृ.वि. अकोला व बी.ए. आर.सी मुबंई यांनी संयुक्तपणे १९८५ मध्ये प्रसारीत केला आहे.
◼️ भुरी रोगास हे वाण प्रतिकारक आहे. ७० ते ७५ दिवसात हे वाण काढणीस तयार होतो.
◼️ या वाणांमध्ये १९ ते २ टक्के प्रथिने आढळून येते.
◼️ या वाणाचे सरासरी उत्पादन १०-१२ क्विंटल प्रति हेक्टरी आहे.
◼️ शेंग काळी व चोपडी असून दाणे मध्यम आकाराचे व काळे रंगाचे असुन १०० दाण्याचे वजन ३.५ ते ३.८ ग्रॅम इतके असते.
३) टी पी यु-४
◼️ हे वाण लवकर तयार होणारे असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस केले आहे.
◼️ हा वाण ६५ ते ७० दिवसामध्ये काढणीस तयार होते.
◼️ या वाणाचे दाणे काळे टपोरे आहेत.
◼️ प्रति हेक्टरी उत्पादन १०-११ क्विंटल आहे.