गेल्या वर्षी राज्यात 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे ‘मनरेगा या योजनेअंतर्गत उद्दिष्ट्य देण्यात आले होते. यासाठी 93 हजार 902 शेतकऱ्यांचे अर्ज जमा झाले होते . 65 हजार 421 हेक्टरला प्रशासकीय मान्यता तर 68 हजार 348 हेक्टरला तांत्रिक मान्यता कृषी विभागातर्फे देण्यात आली होती.
या वर्षी देखील पुन्हा एकदा ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. यासाठी फलोत्पादन संचालकांनी फळबाग लागवडीचे वेळापत्रक सादर केले आहे .
राज्यात गेल्यावर्षीच्या फळबाग लागवडीसाठी कुशलसाठी 30 कोटी ९२ लाख 68 हजार तर अकुशल करिता 146 कोटी45लाख 10 हजार असा एकत्रित 177 कोटी 37 लाख 78 हजार इतका निधी सरकारने खर्च केला आहे.
फळबाग योजनेतून संत्र्याची 4 हजार 323 हेक्टर , आंब्याची 19 हजार 348 हेक्टर , नारळाची, 1हजार 597हेक्टर , मोसंबीची 2 हजार 856 हेक्टर , डाळिंबाची 1 हजार 384 हेक्टर ,सीताफळाची 1हजार 890 हेक्टर या फळझाडांची या योजनेतून लागवड करण्यात आली होती. कोरडवाहू क्षेत्रात 75 % तर बागायत क्षेत्रात 90% झाडांना जिवंत ठेवणाऱ्या व नीट काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान दिले जाते.
फळझाडांची 0.05 ते 2 हेक्टर या मर्यादेत लागवड करता येते. गिरीपुष्प, नारळ, आवळा,चिंच, कवठ,कोकम, फणस, डाळिंब, संत्रा, आंबा, काजू, सीताफळ, लिंबू, मोसंबी, जांभूळ, शेवगा, हादगा, गुलाब, मोगरा, लवंग, दालचिनी,निशिगंध, जायफळ, गिरीची याची लागवड करता येते फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी अशी माहिती दिली .
पुणे, परभणी, वाशीम,यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर,, रायगड,ठाणे, बुलडाणा, पालघर या ठिकाणी फळबाग लागवडीचे काम चांगले झाले असून ,आता गावस्तरावरील पेटीत शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी चा अर्ज टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.फळबागा साठीचे अर्ज ग्रामपंचायतीकडून जून किंवा जुलैपर्यंत ऑनलाइन जमा केले जातात . जुलै ते ऑगस्ट पर्यंत कलमे,रोपे , रोटवाटिकेपासून ते शेतापर्यंत पोहचवायची असतात . प्रत्यक्षात लागवड ही जून ते डिसेंबरमध्ये करून घ्यावी लागते. ‘मनरेगा या योजनेतून सलग तीन वर्षे अधिकची फळबाग लागवड केल्यामुळे , कृषी आयुक्त सुनील चव्हाण, डॉ. मोते यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल हे उपस्थितीत होते .
विभागाचे नाव २०२२-२३ मधील लागवड २०२३-२४ मध्ये उद्दिष्ट
अमरावती ६८२८.२६ ८ हजार २००
नागपूर ५५१४.१३ ७ हजार ५००
पुणे ५८६७.२६ ८ हजार ७००
कोल्हापूर १०६१.४० ३ हजार ४००
ठाणे ८६८९.९८ १४ हजार
नाशिक ६२१०.५३ १० हजार
औरंगाबाद २४१२.५५
३ हजार ३००