पीएम किसानचे 2000 रुपये उदया म्हणजेच 5 ऑक्टोबरला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात, वाचा सविस्तर !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे.शेतकऱ्यांना 34 हजार रुपयांची रक्कम आतापर्यंत 17 हप्त्यांद्वारे पीएम किसान सन्मान योजनेतून बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. आता पीएम किसानच्या वेबसाईटनुसार 18 व्या हफ्त्याचे पैसे ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल.शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान योजने पैसे ३ टप्प्यात 6 हजार रुपये पाठवण्यात येतात . परंतु , या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा आहे तर त्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे.  ई केवायसी केली नाही तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 18 वा हप्ता मिळणार नाही.

पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात शेतकऱ्यांना मिळाली होती. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबरला दिली जाणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीअगोदर पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना दरवर्षी २ हजार रुपयांची रक्कम एका हप्त्यात देण्यात येते .

ई केवायसी तातडीने करुन घेणे आवश्यक..

ई केवायसी प्रक्रिया जे शेतकरी पूर्ण करणार नाही त्यांना 18 व्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाही पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घेणं आवश्यक केले आहे . यामुळे ज्यांनी अजूनही पीएम किसान सन्मान योजनेची ई केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करुन घेणं आवश्यक आहे.

ई केवायसी कुठे करायची..

ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला https://pmkisan.gov.in/ भेट द्यावी. तिथे ई केवायसी या पर्यायवर क्लिक करावे . ई केवायसी ऑपशनवर क्लिक केल्यावर ओटीपी बेस्ड ई केवायसी हा ऑपशन दिसेल. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे . आधार नंबर टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओटीपी मिळेल. ओटीपी टाकल्यावर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. नागरी सुविधा केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही ई – केवायसी साठी अर्ज करू शकता.

जमीन पडताळणी व आधार बँक लिंकींग आवश्यक ..

बँक खातं आणि आधार क्रमांक पीएम किसान सन्मान योजनेतून आर्थिक रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी लिंक करुन घेणं आवश्यक आहे. तर, जमीन पडताळणी देखील करुन घेणे आवश्यक आहे.

 

Leave a Reply