PM Kisan samman: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर मिळणार पीएम किसानचा १९ वा हप्ता? जाणून घ्या अधिक

PM Kisan Samman 19th installment date and maharashtra new chief Minister oth taking ceremony relation पीएम किसान योजनेचा मागील हप्ता म्हणजेच १८ वा हप्ता वाशिम येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे महिनाभरापूर्वी जारी केला होता. राज्यातील विधिमंडळ निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

निवडणुक निकालानंतर आता काही माध्यमे आणि सोशल मीडियातून पीएम किसान (PM Kisan samman yojana) सन्मान योजनेचा पुढील हप्ता नव्या मंत्रिमंडळ शपथविधीत जमा करण्यात येईल अशी चर्चा होताना दिसत आहे. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्याने सरकारस्थापनेच्या (Maharashtra’s New Chief Minister) वेळी किंवा नंतर लगेच हा हप्ता मिळेल अशा बातम्या सध्या फिरताना दिसत आहेत. मात्र यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊ यात.

देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे, हे लक्षात घेऊन 2019 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती.

या योजनेद्वारे, भारत सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. 6,000 रुपयांची ही आर्थिक मदत गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते.

आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे एकूण 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता.

18वा हप्ता जमा होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या कारणास्तव, देशातील कोट्यवधी शेतकरी आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान केंद्र सरकार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करू शकते. विशेष म्हणजे सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी करण्यात आला. त्यामुळे ऑक्टोबरच्या चार महिन्यांनंतर पुढील वर्षी फेब्रुवारी महिना येत आहे. त्यामुळे या योजनेचा 19 वा हप्ता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply