आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारद्वारे PM किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे.आतापर्यंत शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा 13 व्या हप्त्यापर्यंत लाभ मिळालेला आहे . 14व्या हप्त्याची सर्व शेतकरी वाट बघत आहेत. 26 ते 31 या तारखेच्या दरम्यान पीएम किसान निधी चा १४ वा हफ्ता मिळण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्सने वर्तवली आहे.
पीएम किसान सन्मान निधीचे पैसे काही शेतकऱ्यांना मिळतात तर काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी आनंदात तर काही शेतकरी दुःखात आहेत. जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही खालील स्टेप फॉलो करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
14 वा हप्ता मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे
स्टेप १ :- पीएम किसान वेबसाइटला ओपन करा व ‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक करा.
स्टेप २ :- ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या ऑपशनवर क्लिक करून आधार नंबर त्यावर भरावा लागेल आणि त्यानंतर दिलेला कॅप्चा भरा.
स्टेप ३ :- आवश्यक असलेली माहिती भरून ‘होय’ या बटनावर क्लिक करा.
स्टेप ४ :- अर्ज फॉर्म वर विचारलेली माहिती भरून , ती जमा करा . व त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.
पंतप्रधान किसान योजनेसाठी कोण पात्र आहे?
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले शेतकरी आणि सीमांत शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील तसेच सर्व जमीन धारक शेतकरी.
पंतप्रधान किसान योजनेसाठी कोण पात्र नाही?
• घटनात्मक पदांवर असलेले शेतकरी कुटुंबे.
• सरकारी कामगार.
• राज्य किंवा केंद्र सरकार मध्ये काम करणारे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी.
• दर महिना 10,000 पेक्षा जास्त कमवणारे लोक .
• वकील , डॉक्टर , अभियंते, पेन्शनधारक