पीएम किसानचा १४ वा हप्ता मे मध्ये येणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये , तेव्हा लवकर केवायसी करून घ्या ..

pmkisan

शेतकऱ्यांना वर्षातून २००० रुपयांचे तीनदा तीन हप्ते पीएम किसान योजनेमार्फत मिळतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार एका वर्षाला ६००० रुपये जमा करते.

सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचे १३ हप्ते जमा केले आहेत. त्यानंतर सर्व लाभार्थी १४ व्या हप्त्याची वाट बघत आहेत. हा हप्ता मे किंवा जून महिन्यात येऊ शकतो. यासाठी पूर्ण तयारी सरकारनेही केली आहे. शेतकऱ्यांना वर्षातून २००० रुपयांचे पीएम किसान योजनेअंतर्गत तीन हप्ते तीनदा मिळतात.

जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही योजना सुरू केली होती.शेतकऱ्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी सरकार त्यांना पैसे देते. ते एका वर्षात तीन भागांत ६,००० रुपये देतात. सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये देतात. त्यांनी हे पैसे यापूर्वी 13 वेळा शेतकऱ्यांना दिले आहेत.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ४००० चा हफ्ता ?

जे शेतकरी १३ व्या हफ्त्यापासून वंचित राहिलेले आहेत (लाभ मिळालेला नाही) अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र दिले जातील.म्हणजेच त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये जमा केले जातील . अनेक शेतकरी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना १३व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत.परंतू आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता २००० ऐवजी ४००० रुपये मिळणार आहेत.

या पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता

१४ व्या हप्त्यासाठी शेतकरी पीएम किसानच्या वेबसाइटवर भेट देऊ शकतात. यावरून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील की नाही ते पाहता येईल. ते चेक करण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या http://pmkisan.gov.in/ वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवरील फार्मर्स कॉर्नरवर जावे लागेल आणि लाभार्थी स्थितीचा पर्याय निवडा. यावर बँकेचा खाते नंबर, आधार नंबर, किंवा मोबाइल नंबर यांच्यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन नंबरद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही हे पाहू शकता.

लाभार्थी स्थिती काय आहे?

शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजना खात्याच्या लाभार्थी स्थितीमध्ये संपूर्ण माहिती असते . त्या शेतकऱ्याला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत,त्याच्या बँक खात्यात पैसे कधी जमा झाले आहेत, त्याचे कोणते हप्ते अडकले आहेत, ते का अडकले आहेत,त्याचे आधार कार्ड पडताळले आहे की नाही इत्यादी. माहिती आपणांस मिळते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *