शेतीचे कामे (BBF) बीबीएफ यंत्रामार्फत चांगल्या प्रकारे होतात . (Perni Yantra Scheme पेरणी यंत्र स्कीम) ह्या योजनेअंतर्गत पेरणी यंत्र खरेदी करणासाठीची सर्व माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात . तसेच पेरणीयंत्राच्या मूळ किंमतीतून ५० % दरात त्यांना सूट भेटेल.
ज्या शेतकरांना पेरणी यंत्रासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी आजच www. mahadbt.Com या लिंकवर जाऊन अर्ज करू शकता . अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्याच्या पिकांच्या उत्पादनात वाढ करणे ,तसेच उत्पादनाचा खर्च कमी करणे शक्य होईल . खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यावर किंवा कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यावर जमिनीतील पाण्याचा निचरा अतिशय योग्य प्रकारे या यंत्राद्वारे करण्यास मदत होते.
यामुळे जास्त पाऊस झाल्यावर जमिनीत पाणी साचून पिकांचे होणारे नुकसान टाळता येते. जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर जाऊन समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच यासाठी लागणारे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सदर घटकाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.या यंत्राच्या वापरामुळे पेरणीसाठी लागणारा वेळ हा कमी लागतो. आंतरमशागतीसाठी दोन ओळीतील अंतर योग्य प्रकारे ठेवावे लागेल . या यंत्राचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून द्यावा .
शेतकऱ्यांसाठी अशा नवनवीन योजना राज्य सरकार उपलब्ध करत असते . याचा लाभ शेतकरी आपल्या शेतीच्या उपयोगासाठी करू शकतात. या यंत्राचा लाभ घेतल्यास शेतीची कामे चांगल्या प्रकारे पार पाडली जातील.