तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक मदत मिळण्याची प्रतिक्षा असेल, तर तुम्हाला सरकारकडून मदत मिळणार आहे. केंद्र सरकारकडून पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Scheme) सुरु करण्यात आली असून ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवाय देते. तुम्ही ठराविक 18 क्षेत्रांशी जोडलेलं असणं या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
आर्थिक सहाय्यासह कौशल्य प्रशिक्षण.
केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना ही सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज दिले जाते आणि व्यवसाय करणाऱ्या प्रोत्साहित केले जाते. गेल्या सप्टेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंती निमित्त ही योजना सुरू केली. लोकांना यामध्ये विविध व्यवसायांशी निगडित हमीशिवाय कर्ज दिले जाते. इतकेच नव्हे तर त्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची ही व्यवस्था सरकारने सुरू केली आहे. यासोबतच प्रशिक्षणावेळी स्टायपेंडसह इतर लाभ मिळण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
दोन टप्प्यांमध्ये मिळणार कर्जाची रक्कम.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोणत्याही कुशल व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते . तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक समस्यांमुळे अडचणी येत असतील तर तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.यामध्ये सरकारद्वारे तीन लाख रुपयांचे कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम दोन टप्प्यात दिली जाते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये लाभार्थी त्याच्या विस्तारासाठी दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात हे कर्ज अत्यंत सवलतीच्या पाच टक्के व्याजदराने दिले जाते.
प्रशिक्षणासह दररोज 500 रुपये मोबदला.
या योजनेमध्ये व्यवसाय उभारण्यासाठी तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यासोबतच दुसरीकडे या अंतर्गतच ठरलेला 18 ट्रेड मधील लोकांचे कौशल्य अधिक सुधारण्यासाठी सुमारे एक आठवड्याचे प्रशिक्षणही दिले जाते मास्टर ट्रेनर च्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते. आणि त्याविषयी प्रतिदिन पाचशे रुपये स्टायपेंड देखील दिला जाईल. लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाची संबंधित कौशल्य ग्रेड 15000 रुपयांची टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाईल.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवार.
कर्ज मिळवण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे गरजेचे आहे. या योजनेद्वारे 18 क्षेत्रातील कामगारांना कर्ज मिळू शकते.
1. सुतार
2. बोट किंवा नाव बनवणारे
3. लोहार
4. टाळे बनवणारे कारागीर
5. सोनार
6. कुंभार
7. शिल्पकार
8. मेस्त्री
9. मच्छिमार
10. टूल किट निर्माता
11. दगड फोडणारे मजूर
12. मोची कारागीर
13 . टोपली, चटई, झाडू बनवणारे
14 . बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक
15 . न्हावी
16. हार बनवणारे
17. धोबी
18 . शिंपी
कर्ज मिळवण्यासाठी ची पात्रता..
◼️ अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
◼️ अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रांपैकी एका मधील असावा.
◼️अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त व पन्नास वर्षापेक्षा कमी असावेत.
◼️ मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेड चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◼️ योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे..
◼️ आधार कार्ड
◼️ पॅन कार्ड
◼️ जात प्रमाणपत्र
◼️ उत्पन्न प्रमाणपत्र
◼️ ओळखपत्र
◼️ पत्त्याचा पुरावा
◼️ पासपोर्ट आकाराचा फोटो
◼️ बँक पासबुक
◼️ वैध मोबाईल नंबर
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
1. अधिकृत वेबसाईट pmvishwakarma.gov.in वर जा.
2. मुख्यपृष्ठावरती पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना हा ऑप्शन असेल.
3. येथे Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.
4. त्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
5. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे पाठवला जाईल.
6. यानंतर नोंदणी फार्म पूर्णपणे वाचा व व्यवस्थित रित्या भरा.
7. भरलेल्या फॉर्मसह सर्व कागदपत्रे स्कॅन करा अपलोड करा.
8. आता फॉर्ममध्ये प्रविष्ट भरलेली माहिती केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.