kanda bajarbhav : कांदा आवक घसरल्याने भाव टिकून; या बाजारात कांद्याला मिळाला ५ हजाराचा भाव

kanda bajarbhav

kanda bajarbhav :  गुरुवार दिनांक १९ रोजी महाराष्ट्रात एकूण २ लाख ६७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. बुधवारच्या तुलनेत कांदा आवकेत काहीशी घट झाल्याचे दिसून आले.

लासलगाव बाजारात शेतकऱ्यांनी अचानक लिलाव बंद पाडून आंदोलन केले होते. कांद्याचे भाव घसरल्याने गुरूवारी सकाळी हे आंदोलन केले. मात्र आंदोलन मागे घेतल्यानंतर लिलाव पुन्हा सुरळीत होऊन लासलगाव बाजारात २५ हजार क्विंटल आवक झाली, विंचूर बाजारात सुमारे १० हजार क्विंटल, पिंपळगाव बाजारात १९ हजार क्विंटल अनुक्रमे लाल आणि पोळ कांद्याची आवक झाली.

असे आहेत कांद्याचे बाजारभाव..

नगर बाजारात मात्र आवक काहीशी वाढल्याचे दिसून आले. नगर बाजारात ६६ हजार क्विंटल आवक झाली. नगर जिल्ह्यातील राहुरी, जामखेड, कोपरगाव आणि संगमनेर बाजारातही अनुक्रमे सव्वा सात हजार, सव्वापाच हजार, पावणेपाच हजार आणि सव्वा हजार क्विंटल आवक पाहायला मिळाली. नगरमध्ये बुधवारच्या तुलनेत आवक वाढली, तर नाशिकमध्ये काहीशी घटली. सोलापूरमध्ये लिलाव बंद पाडण्याचे आंदोलन झाल्याने तेथील आवक समजू शकलेली नाही.

दरम्यान लासलगाव बाजारात गुरूवारी लाल कांद्याला कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १९०० रुपये बाजारभाव मिळाला. सोमवारच्या तुलनेत सरासरी बाजारभावात एकदम ३०० ते ४०० रुपये घसरण पाहायला मिळाली. पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी १९०० रुपये बाजार मिळाला. नगरला लाल कांद्याला १९५० रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. शेवगाव बाजारात एक नंबर कांद्याला सरासरी २२५० रुपये बाजारभाव मिळाला.

नागपूरच्या रामटेक बाजारात सर्वाधिक म्हणजेच ४५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मात्र कांद्याचा प्रकार समजू शकला नाही. या बाजारात गुरुवारी केवळ २०० क्विंटल आवक झाली. पुणे बाजारात लोकल कांद्याला २४०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला, तर मोशी येथे सरासरी २२०० रुपये बाजारभाव मिळाला. सातारा जिल्ह्यातील वाई येथे लोकल कांद्याला राज्यात सर्वाधिक म्हणजेच ५ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला. याठिकाणी केवळ १७० क्विंटल आवक झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *