अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या बिपोर जॉय चक्रीवादळामुळे मान्सून तिथेच खोळंबला होता . आता मान्सून ने केरळमध्ये आगमन केल्यानंतर येत्या 48 तासातच तमिळनाडू, आंध्र प्रदेश ,गोवा हे राज्य ओलांडत महाराष्ट्र मध्ये मान्सून ने आगमन केलेले आहे. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र ,दक्षिण कोकण यातला काही भागामध्ये मान्सून झाला . हवामान अंदाजानुसार 48 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दाखल होईल.
मान्सूनने ने गोवा, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर तसेच रत्नागिरी मध्ये मान्सून ने प्रगती केली. तसेच मान्सून रत्नागिरी, हसन, श्रीहरिकोटा, धुपरी, उत्तर सीमा ,धर्मपुरी, येथून जात आहे. मान्सून हा येत्या 48 तासांमध्ये आणखीन प्रगती करेल असे हवामान अंदाजानुसार सांगितलेले आहे.
मुंबईकरांना समुद्र लाटांनी भरली धडकी
पावसाच्या अगोदर समुद्रात उसळलेल्या लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. वरळी ,वांद्रे सी ,जुहू चौपाटी ,मरीन ड्राईव्ह, मार्वे, उत्तर परिसरात चार मीटर उंच लाटा उसळल्या होत्या.
मान्सून अशी मारेल मजल.
येत्या 48 तासांमध्ये मान्सूनला पोषक असे हवामान निर्माण झालेले आहे. या काळामध्ये मान्सून अरबी समुद्राचा काही भाग ,कर्नाटक, महाराष्ट्र , आंध्र प्रदेशचा काही भाग, तमिळनाडूचा काही भाग ,तसेच दक्षिण आणि वायव्य बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, ईशान्य भारतातील काही राज्य, या राज्यांमध्ये मजल मारण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
चक्रीवादळ कुठे गेले ?
बिपोर जॉय चक्रीवादळ हे अतिशय तीव्र झालेले आहे. यामुळे सौराष्ट्र कच्छ किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. रविवारी हे वादळ मुंबईपासून 580 किलोमीटर दूर होते तसेच ते 15 जून च्या दरम्यान हे वादळ मांडवी-करांची ओलांडण्याची शक्यता असून , त्यावेळी 125 ते 150 किलोमीटर या वेगाने वारे वाहतील.