सध्या पावसाने सगळीकडे दाणादाण केले आहे . अनेक ठिकाणी पूर आला असून रोडवर दरडी पडले आहेत . धरणे देखील भरू लागले आहेत. राज्यभर सुरू असलेल्या या पावसाचा जोर सोमवारी कायम होता. मंगळवारी सकाळपासून पुन्हा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. यामुळे हा जोर वाढतच चालला आहे. दरम्यान पुणे, सातारा ,ठाणे, रत्नागिरी ,या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे . तसेच विदर्भ, खानदेश, मराठवाडा या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर ,या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढतच राहणार आहे. यामुळे नद्यांना पूर देखील येण्याची शक्यता आहे . अनेक ठिकाणी सध्या नद्यांना पूर आले आहेत. तसेच धरणे देखील भरायला लागली आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पश्चिम किनारी, कोकण त्याचबरोबर विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस आहे . शेतीची कामे सध्या सुरू झालेली आहेत.
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती झाला पाऊस.
छत्रपती संभाजी नगर राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असून, तर कुठे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या नद्याही भरून वाहत आहे. मराठवाड्यात अजूनही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहेत . मागील काही आठवड्यात फक्त 37.8% इतका पाऊस झाला आहे तर मराठवाड्यात 13 टक्के पावसाचे तूट आहे. नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे .
यामुळे विभागातील प्रकल्पात फक्त 36.85% पाण्याचा साठा शिल्लक राहिलेला आहे . मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर आतापर्यंत केवळ रिमझिम पाऊस होत असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. दरम्यान जुलै महिन्यात मराठवाड्यात सर्व मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. याशिवाय ते 48 तासांमध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचेही आयएमडी कडून सांगण्यात आले आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची दहा हजाराची मदत, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.
राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली . पावसामुळे नुकसानग्रस्तांसाठी तातडीची दहा हजार रुपयांची आर्थिक मदत अजित पवार यांनी जाहीर केली आहे. तसेच दुकानांचे नुकसान झाले असल्यास पन्नास हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
पावसाच्या पाण्यामुळे जे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत . त्या पूर्ववत करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी निर्णय घ्यायचा आहे. पुरात बाधित झालेल्या व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचं वाटप करावं,” असे निर्देशही अजित पवार यांनी काढले आहेत.
ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे, त्यांना सध्याच्या दराने 5000 आणि सानुग्रह देण्याची कारवाई सुरू करायची परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सानुग्रह दहा हजार देण्याचा आत्ताच निर्णय घेतला आहे. असं अजित दादा पवार विधान परिषद स्पष्ट म्हणाले.