आरसीएफ करणार आता मिश्र खतांची निर्मिती, खताच्या किमती होणार कमी..

मिश्र खत निर्मिती प्रकल्प अलिबाग थळ येथे उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले आहे , २७ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या प्रकल्पात युरिया आणि अमोनिया खतांची निर्मिती होते, हा विस्तार भूसंपादन न करता होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे खताच्या आयातीचे प्रमाण कमी होणार आहे ,मिश्र खताच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या युरिया आणि अमोनिया खताची निर्मिती आरसीएफ खत निर्मिती प्रकल्पातून करण्यात येत आहे. आता प्रकल्पाचा विस्तार होणार असून युरिया आणि अमोनिया बरोबरच मिश्र खतांची निर्मिती करण्यात येणार आहे.

यासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कण्यात येणार आहे , प्रकल्पातून दररोज १२०० मेट्रिक टन मिश्र खत तयार करण्याचा प्रयत्न आहे . एल अॅण्ड टी कंपनीला कंपनीच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे .

डीएपीसारख्या मिश्र खतांना बाजारात मोठी मागणी आहे.

परंतु भारतात त्याचे फारसे उत्पादन होत नाही त्यामुळे त्याची आयात करावी लागते. मिश्र खतांची मागणी २०१८-१९ मध्ये साडेसहा हजार दशलक्ष टनावर पोहोचली होती. त्यानंतर त्याच्या आयातीवर रशिया-युक्रेनमधील युद्ध स्थितीमुळे परिणाम झाला होता.

भारत योजने अंतर्गत ही बाब लक्षात घेऊन आत्मनिर्भर देशांतर्गत मिश्र खतांच्या निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे . केंद्र सरकारने याचाच एक भाग म्हणून मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारणीस मान्यता दिली आहे , प्रकल्प उभारणीचे कंत्राट कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये कामाला सुरुवात होणार आहे.

मिश्र खतांचे उत्पादन देशांतर्गत सुरू झाल्यामुळे खतांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे , असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *