शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांचे अनुदान- पंतप्रधान मोदी..

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांचे अनुदान- पंतप्रधान मोदी..

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांची अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे . युरियाच्या एका पिशवीची किंमत 3000 रुपये असताना शेतकऱ्यांना तो तीनशे रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात, असल्याचे मोदी म्हणाले देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली.

शेतकऱ्यांना 3000 रुपयांपेक्षा जास्त दराने युरिया जागतिक बाजारपेठेत विकला जात आहे.  ज्या युरियाची पिशवी काही जागतिक बाजारपेठेमध्ये 3000 रुपयांना विकली जाते तोच युरिया आता सरकार आपल्या शेतकऱ्यांना तीनशे रुपये दराने विकते.  शेतकऱ्यांसाठी सरकारने युरियावर दहा लाख कोटी रुपयांची अनुदान देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले.  यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले , मी तुमच्यातून आलोय, तुमच्यासाठी जगतोय, मी स्वप्न देखील तुमच्यासाठी पाहतोय मी कष्ट करतोय ते देखील तुमच्यासाठीच करत आहे . मला ही जबाबदारी तुम्ही दिली म्हणून मी हे करत नाही . तर हा देश माझे कुटुंब आहे.  त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना दुःख झालेले मी पाहू शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

सलग 10 वर्षे झेंडा फडकावून देशाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं.

सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा फडकवला . देशातील चौथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.  की त्यांनी सलग दहा वर्ष झेंडा फडकवून देशाला संबोधित केला आहे.  यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी म्हणून मनमोहन सिंग यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता.

 जवाहरलाल नेहरु यांनी 17 वेळा देशाला संबोधित केले आहे. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी  72 मिनिटे इतका होता. 16 वेळा इंदिरा गांधी यांनी तर दहा वेळा लाल किल्ल्यावरून देशाला मनमोहन सिंह यांनी संबोधित केले. त्यांच्या सर्वाधिक 50 मिनिटे इतका वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *