मुलींसाठी या 5 सरकारी योजना उत्तम, अभ्यासापासून ते लग्नापर्यंतचे कोणतेही टेन्शन राहणार नाही..

मुलींसाठी या 5 सरकारी योजना उत्तम, अभ्यासापासून ते लग्नापर्यंतचे कोणतेही टेन्शन राहणार नाही..

बेटी पढाव बेटी बचाव या योजनेअंतर्गत समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे ही एक प्रकारची बचत योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीचे दहा वर्षापेक्षा कमी वयाचे बँक खाते उघडले तर तुमच्या मुलीला दरवर्षी काही रक्कम जमा करण्यासाठी चांगले व्याज मिळते ती मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तुम्हीही ठेव काढू शकता आणि ही रक्कम तिच्या शिक्षण किंवा लग्न साठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकता.

सुकन्या समृ द्धी योजनेचे उद्दिष्टे आणि फायदे.

तुम्ही तुमच्या मुलीचे खाते फक्त 250 रु रकमेने उघडू शकता. तुम्ही एका आर्थिक वर्षात एक लाख पन्नास हजार रुपये जमा करू शकता.

जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते.

तुमची मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर या जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम तुम्ही काढू शकता.

तुम्ही तुमच्या मुलीचे खाते हे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

तुमची मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही सगळी रक्कम काढून घेऊ शकता.

बालिका समृद्धी योजना

बालिका समृद्धी योजना ही 15 ऑगस्ट 1997 रोजी सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींना लाभ दिला जातो गरीब कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच याचा लाभ दिला जातो.

बालिका समृद्धी योजनेचे उद्दिष्टे आणि फायदे

सरकारकडून मुलींच्या जन्मावर पाचशे रुपये.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींचे शिक्षणासाठी वार्षिक शिष्यवृत्ती दिली.

या योजनेचा उद्देश म्हणजे शाळेच्या नाव नोंदणी मध्ये  सहभाग वाढवणे.

मुलींना शिक्षण देणे.

बालविवाह थांबवणे.

 मुलींचा शैक्षणिक विकास करणे.

  सीबीएससी उडान योजना

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससी ने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहकार्याने सीबीएससी उड्डाण योजना सुरू केली आहे ही योजना मुलींसाठी उच्च शिक्षण देण्यासाठी चालवली जात आहे या योजनेअंतर्गत मुलींना विज्ञान आणि गणितचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते अशा सर्व मुलींना ज्यांना बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून याचा लाभ घेऊ शकता.

या योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे

मोफत अभ्यासक्रम साहित्य आणि ऑनलाइन सेवा प्रधान करणे जसे की शिक्षणाची संबंधित किंवा मुलींच्या विषयाशी संबंधित व्हिडिओ.

गरीब मुलींसाठी उच्च शिक्षण मिळावे तसेच भारतातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालय मध्ये त्यांची नोंदणी वाढवणे.

सर्व पात्र व पात्र विद्यार्थिनींना तांत्रिक महाविद्यालयात दाखल करणे.

मुख्यमंत्री राजश्री योजना

ही योजना राजस्थान राज्य सरकार यांनी मुलींसाठी ही योजना सुरू केली आहे 2016 ते 17 या कालावधीमध्ये ही योजना जाहीर करण्यात आली होती मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी 50000 रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते या योजनेत राजस्थानच्या मूळ कुटुंबातील एक जून 2016 नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेमध्ये आर्थिक मदत ही सहा हप्ते मध्ये दिली जाते.

उद्दिष्टे

या योजनेच्या मार्फत मुलींच्या कुटुंबाला तिच्या जन्मापासून तिच्या उच्च शिक्षणापर्यंत कायमस्वरूपी लाभ दिला जातो.

मुलीच्या आईला मुलीच्या जन्मानंतर पंचवीसशे रुपये दिले जातात.

ती मुलगी एक वर्षाची झाल्यानंतर परत २५०० रुपये दिले.

इयत्ता पाचवी मध्ये ती मुलगी पाचवी मध्ये असताना 5000 आणि अकरावी मध्ये असताना 11000 रुपये इतकी रक्कम दिली जाते.

मुलींची शाळेतील संख्या वाढवणे त्या मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना

ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारची आहे माजी कन्या भाग्यश्री या योजनेमार्फत मुलींच्या जन्मावर आईला खालील आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील अशा गरीब मातांना ज्यांनी मुलींना जन्म दिला आहे त्यांना जन्मानंतर पहिल्या पाच वर्षासाठी 5000 रुपये दिले जातात ही योजना मुलींच्या जन्मासाठी आणि मुलींचे शिक्षणासाठी कुटुंबाला आर्थिक रक्कम देते.

उद्दिष्टे

माझी कन्या भाग्यश्री ही योजना गरीब कुटुंबातील मुलींसाठी सुरू केले आहे.

मुलींचे जन्मानंतर पुढील पाच वर्षांसाठी तिला पाच हजार रुपये दिले जातात.

मुलगी पाचवी पर्यंत पोहोचेपर्यंत कुटुंबाला दरवर्षी अडीच हजार रुपये दिले जातात.

मुलगी बारावी पर्यंत जाईपर्यंत तिला दरवर्षी तीन हजार रुपये मुलींच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात.

मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या शिक्षणासाठी वार्षिक एक लाख रुपये दिले जातात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *