शिंदे-फडणवीस सरकारचे महत्वपूर्ण निर्णय ! पहा सविस्तर

शिंदे-फडणवीस सरकारचे महत्वपूर्ण निर्णय ! पहा सविस्तर

शिक्षण

पहिले ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

वैमानिक प्रशिक्षणासाठी वीस व्यक्तींना दहा हजार दर महिन्याला विद्या वेतन देणार .

मराठी भाषा विद्यापीठ श्री क्षेत्र रिद्धपूर येथे स्थापन करणार.

खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्तीची योजना लागू होणार 21 अभिमत विद्यापीठातील 14,232 विद्यार्थ्यांना लाभ.

मागास प्रवर्गातील मॅट्रिक उत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी 72 शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देणार.

250 शासकीय आदिवासी आश्रम शाळांना आदर्श आश्रम शाळा करण्यास मान्यता दिली .

पुणे येथील बालेवाडी येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणार. छत्रपती संभाजी नगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठात 50 कोटीची मान्यता.

रोजगार

शिपाईसाठीची रिक्त असलेली पदे 100% भरणे. वीस हजार पोलीस शिपायांची पदे भरणे.

 मराठा युवकांच्या शासकीय नोकरीच्या नियुक्तीसाठी जास्त संख्या पदे निर्माण. स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनर्विजीवन. मराठा तरुणांना उद्योजक होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणार.

मराठा समाजासोबतच अन्य प्रवर्गातील १०६४ उमेदवारांना जास्त पदावरील नियुक्तीचे पत्र. त्यामधील 78 उमेदवारांना प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रके .

मुंबई ही फिनटेक्स स्टार्टअप कॅपिटल बनली आहे.

शेती

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित शेतीच्या नुकसानी करिता मदतीचा निर्णय.

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आत्तापर्यंत 755 कोटी 69 लाख रुपये निधी वाटप करण्यात आला आहे.

सोयाबीन पिकावर नुकसान भरपाई म्हणून 98. 58 कोटी इतका निधी वाटप.

नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांसाठी 350 रुपये प्रतिक्विंटल अर्थसहाय्य.

बाजार समितीच्या निवडणूक मध्ये शेतकऱ्यांना थेट मतदान करता येणार.

राज्यामध्ये काजू फळ पिकावर विकास योजना लागू होणार.

जलयुक्त शिवार हे अभियान 5000 गावात परत सुरु.

सुमारे 69 हजार हेक्टर शेत जमिनीवरील विकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी केला.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त या योजनेतून 50 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम देण्यात आली.

200 साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप घेतले असून शेतकऱ्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी दिली.

तीन वर्षात शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 30 टक्के कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण केले. त्यामधून 9.50 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

86 हजार 73 प्रलंबित कृषी पंप अर्जांना तात्काळ वीज जोडणी.

नाशिक जिल्ह्यामधील गोदावरी प्रकल्पाच्या  १ हजार ४९८ कोटी 61 लाख खर्चास प्रशासकीय मान्यता.

अहमदनगर, औरंगाबाद ,नाशिक या जिल्ह्यामधील 74 हजार 210 हेक्टर सिंचन क्षेत्रात लाभ मिळाला .धाराशिव बीड जिल्ह्यांमध्ये  कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून 133 गावांना सिंचनाचा लाभ मिळाला.

मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी 1000 कोटी रुपये खर्च करणार .

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान या योजनेला सरकारकडून दोन लाखाचा लाभ .

नागपूर मध्ये कृषी सुविधा केंद्र विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन. नागपूर मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार.

महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान 200 कोटी रुपयांची तरतूद.

हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.

फळ उत्पादन विकास अभियानात शेतकऱ्यांना 12 कोटी होऊन जास्त अनुदान थेट त्यांच्या खात्यावर मिळणार.

मच्छीमारांना डिझेल  अनुदानासाठी  नौकेच्या १२० अश्वशक्तीची अट काढली. 

देशी संगोपन संवर्धन संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार.

विदर्भ मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांना दुधविकासासाठी 160 कोटींची तरतूद.

लम्पी चर्मरोगामुळे मृत 18 हजार 432 पशुधनांसाठी सुमारे 46 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करणार.

उद्योग

राज्यात 70,000 कोटींच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली 55 हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती मधून 12 हजारापेक्षा जास्त उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे .

कृषी ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना संकल्प प्रकल्पाद्वारे त्यांच्या समस्या सोडवल्या जातील

महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र या कायद्यामुळे उद्योगांसाठी 119 सेवा सुरू करण्यात आल्या.

महाराष्ट्रात  भिवंडी, रत्नागिरी, अकोला, जळगाव, नाशिक, , सांगली, हिंगोली, रायगड, पुणे येथे ९ लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येतील.

पायाभूत सुविधा

आशियातील सर्वात मोठ्या समूह पुनर्विकास योजनेचा ठाण्यात शुभारंभ.

मुंबईमध्ये सुशोभीकरणाचे 1150 उपक्रम सुरू करण्यात आलेल्या त्यासाठी 1729 कोटी रुपये खर्च.

नागपूरच्या मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन.

नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात .खडकवासला स्वारगेट ,पुलगेट हडपसर ,लोणी काळभोर, या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू.

पुणे रिंग रोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला 250 कोटींची तरतूद.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आता नागपूर शिर्डी भरवीर पर्यंत खुला नागपूर पासून गडचिरोली पर्यंत हा मार्ग वाढवण्यात येणार आहे.

मुंबईमधील कोस्टल रोडचे 62 %काम पूर्ण कोस्टल रोडला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देण्यात येणार आहे.

महिला

महिलांना एसटी प्रवासामध्ये सरसकट पन्नास टक्के सूट.

महिलांसाठी ‘आई ‘हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवणार.

महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 15 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक महिलांची नवीन 2800 बचत गट स्थापन.

नोकरदार महिलांसाठी 50 वस्तीग्रह शक्ती सदन ही नवीन योजना.

महिला सुरक्षा सुविधा जनक प्रवाशांसाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण करणार.

बालसंगोपन या योजनेमध्ये बालकांच्या संगोपनासाठी परिपोषक अनुदानात एक हजार १०० वरून २ हजार २५० रुपये वाढ.

Leave a Reply