पावसाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूंमध्ये किंवा पावसाचा खंड पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना सुरक्षित पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहीर आणि बोरवेल चा वापर खूप मोठ्या प्रमाणात करत असतो.
परंतु विहीर खोदणे हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसते. कारण यासाठी येणार खर्च खूप मोठ्या प्रमाणावर असतो. याच दृष्टिकोनातून शासनाच्या काही योजनांच्या माध्यमातून विहीर आणि बोरवेल यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येत आहे. या योजनेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खूप महत्त्वाची असून या योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरीच्या कामासाठी अनुदान देण्यात येत आहे.
रोजगार हमी योजनेतून आता मिळणार विहिरीसाठी अनुदान.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरी करिता पहिल्यांदा तीन लाख रुपये चे अनुदान दिले जात होते. परंतु आता त्यामध्ये वाढ झाली असून आता तीन लाखा ऐवजी चार लाख रुपये अनुदान विहीर खोदण्यासाठी मिळत आणि एवढेच नाही तर विहीर खोदल्यानंतर तुम्ही पाणी उपसा करण्यासाठी कृषी पंपाची आवश्यकता असते. त्यामुळे या योजनेच्या मार्फत विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बांधवांना सौर पंप देखील देण्यात यावा असे शासन निर्णय मध्ये नमूद करण्यात आले आहे.
या योजनेसाठीची पात्रता
यामध्ये अनुसूचित जाती ,जमाती ,भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री करता असलेली कुटुंबे, शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असलेले कुटुंब ,जमीन सुधारण्याचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अडीच एकर पर्यंत जमीन असलेले सीमांत शेतकरी ,पाच एकर पर्यंत जमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी यासाठी पात्र आहेत.
या योजनेसाठी लाभार्थी अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 0. 40 एकर क्षेत्र संलग्न असणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी विहीर खोदायचे आहे .त्या ठिकाण पासून 500 मीटरवर विहीर नसावी.
दोन विहिरी मधील अंतर हे कमीत कमी दीडशे मीटर असावे.
तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या सातबारावर विहिरीची नोंद नसावी.
लाभार्थ्याकडे जमिनीचा ऑनलाईन दाखला असावा.
जर एका पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेत असेल तर अशावेळी प्रत्येकाची एकूण जमिनीचे संलग्न क्षेत्र 0. 40 आर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.
या कागदपत्रांची आवश्यकता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सातबारा उतारा ऑनलाइन तसेच आठ अ चा उतारा तोही ऑनलाइन ,त्यासोबत जॉब कार्ड ची झेरॉक्स, आणि संयुक्तपणे जर या योजनेमार्फत विहीर घ्यायची असेल तर सर्व लाभार्थ्याचे पाणी वापराबाबतचे करार पत्र यासाठी आवश्यक असते.