Ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांसाठी सरकारकडून मिळणारी 1500 रुपयांची मदत ही महत्त्वाची मानली जात होती. जास्तीत जास्त गरजू महिलांना यामध्ये फायदा व्हावा आणि ज्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांना या योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यासाठी सरकारने काही निकष सुद्धा लावले त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असं सांगण्यात आलं आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची अर्जाची पडताळणी चालू झाल्याचं सुद्धा बोललं गेलं सरकारी तपासा मध्ये हजारो महिलांकडे चार चाकी वाहन असून सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असल्याचं सांगण्यात येतंय.
त्यामुळेच आता चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार का ? यासोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कधी जमा होणार आहे? अपात्र ठरणाऱ्या महिलांचे पैसे माघारी जाणार असं बोललं जातंय त्यात किती तथ्य आहे का ? जाणून घेऊयात या लेखामधून
लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणी बाबत आतापर्यंतच्या कल्याण योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लोकांकडून सर्वात जास्त चर्चेली जाणारी योजना ठरते . लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार अशा चर्चा गेली कित्येक दिवसांपासून होत आहेत सरकारकडे नव्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सुद्धा येत आहेत. मात्र अजून सरकारकडून आधीच्या अर्जांचीच पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे नव्या अर्जांची पडताळणी अजून लांबणीवरच असल्याचं सांगण्यात येतंय अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आधार कार्ड आणि अर्जावरील नावात तफावत नसणाऱ्या तसेच चार चाकी वाहन नसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल हे लाडकी बहीण योजनेचे निकष आहेत . लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषामध्ये तुम्ही बसता की नाही ते पाहण्यासाठी ही अर्जाची पडताळणी महत्त्वाची मानली जाते. पडताळणीसाठी महिला आणि बालकल्याण विभागाने आता मात्र हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका येऊन प्रश्न विचारून तपास करणार आहेत. यामध्ये चार चाकी गाडी असणाऱ्या महिलांचे हप्ते बंद होणार अशा चर्चा सुद्धा सुरू आहेत . दुसऱ्या मुद्द्यातून खरंच चार चाकी वाहनं असणाऱ्या महिलांचे हप्ते बंद होणार का ते पाहूयात. सोमवारी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चार चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश दिले होते.
यासाठी चार चाकी वाहनांसंदर्भात परिवहन विभागाकडून चार चाकी वाहन असलेल्या बहिणींची यादी शासनाला देण्यात आली आहे शासनाकडून देण्यात आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील चार चाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींचा आकडा हा 75100 इतका समोर आलाय या योजनेसाठी जिल्ह्यामधून एकूण अर्ज ते होते 211991 त्यातून लाभ मिळणाऱ्या बहिणी होत्या 208946 त्यांचा चार चाकीचा डेटा काढत असताना पहिल्या यादीमध्ये 58350 इतक्या महिला तर दुसऱ्या यादीमध्ये 16750 इतक्या महिला अशा एकूण 75100 वाहनधारक महिलांची यादी प्रशासनानं तयार केली आहे . या यादीतील नाव तालुक्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिली जाणार आहेत या अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चार चाकीची पडताळणी करणार असल्याची माहिती देण्यात येते पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांच्या तपासात जर महिलेकडे चार चाकी आढळून आली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बहिणींना घेता येणार नाही या पडताळणीमध्ये ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत अशा लाडकी बहिणींचा लाभ रद्द होणार यावर आता शिक्का मोर्तब झालाय तिसरा लाडकी बहिन योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा निर्गम रुपयांचा हप्ता कधीपासून सुरू होणार गरीब आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा आणि सरकारकडून देण्यात आलेले 2100 रुपयांच्या आश्वासनाचा सरकारी तिजोरीवर भार पडू नये यासाठी ही पडताळणी होत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.
पण ज्या 2100 रुपयांचा सरकारी तिजोरीवर भार पडू नये यासाठी हा खटाटोप चाललाय ते 2100 रुपये जमा कधीपासून होणार हा प्रश्न आता महिलांकडून उपस्थित केला जातोय निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपयांवर वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानंतर डिसेंबर मध्ये माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पुढच्या वर्षीच्या भाऊबीजेला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 केला जाईल असं सांगितलं होतं . तर काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेवर विचार होईल असं सांगितलं सांगितलं होतं मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या 2100 रुपयांच्या आश्वासनाचा विचार केला जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते.
या चर्चेनंतर 2100 चा हप्ता लगेच चालू होणार की दिवाळीमध्ये याबद्दल अधिक स्पष्टता मिळू शकते त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष या अधिवेशनाकडे लागलंय यानंतरचा चौथा मुद्दा अपात्र ठरणाऱ्या महिलांचे पैसे माघारी घेतले जाणार का गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील हजारो अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले यातूनच या अपात्र ठरलेल्या महिलांकडून त्यांना याआधी मिळालेले पैसे माघारी घेतले जाणार अशा चर्चा होत होत्या पण यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेमध्ये अपात्र असलेल्या पण लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे माघारी घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाल्या की सरकारने स्वतःहून अजून कुठल्याच महिला लाभार्थ्यांचे पैसे परत घेतलेले नाहीयेत पण बऱ्याच महिलांनी सरकारने तशी मागणी केली नसताना देखील स्वतःहून पैसे माघारी देण्यासाठी अर्ज केलेत मात्र या अपात्र महिलांचे पैसे अजूनही सरकारने परत घेतले नाहीत कारण हे पैसे सरकारी तिजोरीत जमा करून घेण्यासाठी नियोजन विभागाला एक विंडो तयार करावी लागेल.
ज्यामध्ये ज्या अपात्र महिलांची इच्छा आहे त्या महिला त्यांचे पैसे जमा करू शकतील पण सरकार स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना पैसे दिलेत ते माघारी घेणार नाही . महिलांनी स्वतःहून दिलेले पैसे सरकारी तिजोरीमध्ये जमा होतील अशी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिली आहे. पाचव्या मुद्द्यातून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार ते पाहूयात शासनाकडून फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीत मिळणाऱ्या हप्त्याची नेमकी तारीख आणखी समोर आली नसली तरी या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये तो जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असल्यानं हप्ता जमा होण्याची तारीख ही 20 ते 25 फेब्रुवारी असू शकते असं सांगण्यात येतंय पण आणि यावर सरकारकडून अधिकृतपणे काहीच सांगण्यात आलेलं नाहीये .
एकंदरीत पाहता मागच्या बऱ्याच दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी हा सरकारचा निर्णय आता अखेर अमलात येईल असं बोललं जातंय आणि प्रशासनाच्या माध्यमातून सरकार अपात्र ठरणाऱ्या किंवा निकषात न बसणाऱ्या महिलांना सरकार या योजनेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतय त्यात आता चार चाकी असणाऱ्या बऱ्याच महिला अपात्र ठरू शकतात आणि त्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो असं सांगण्यात येतय मात्र या महिलांचे हप्ते कधीपासून बंद होणार याबाबत काही सांगण्यात आलेलं नाहीये तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा .