पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १८) वितरित केला आहे. यातून सुमारे ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २० हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशिक्षित कृषी सखी यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा ‘पीएम किसान’ योजनेच्या फायलीवर सही करून कामाला सुरुवात केली होती.
२८ फेब्रुवारीला या अगोदर या योजनेचा १६ वा हप्ता वितरित करण्यात आला होता. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये मिळतात. हे सहा हजार तीन टप्प्यांमध्ये मिळतात. शेतकऱ्यांना हा निधी डीबीटीअंतर्गत थेट बँक खात्यात जमा होतो .
अशा प्रकारे तपासा खाते…
https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटच्या होमपेजवर शेतकऱ्यांनी जाऊन संबंधित लिंकवर क्लिक करून नोंदविलेला आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाकून दिलेला कॅप्चा पूर्ण करून Get Status वर क्लिक केल्यावर तिथे आपल्या खात्यात पैसे जमा झाल्याचे चेक करता येते . तसेच शेतकरी आपल्या खात्याची स्थिती पीएम किसान मोबाइल ॲपच्या माध्यमातून तपासू शकतात.
शेतकऱ्यांना थेट तक्रार करता येते.
अद्याप राज्य तसेच देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये आलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांना थेट तक्रार करता येते.ज्या शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार रुपये मिळालेले नाही तर ते थेट पीएम शेतकरी सन्मान निधीचे काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार करू शकतात.
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे एक हेल्पलाईन नंबरही जारी केलेला आहे. शेतकरी 011-24300606, 155261 या हेल्पलाईन नंबरवरही थेट तक्रार करू शकतात. तसेच या योजनेचे काम पाहणाऱ्या pmkisan-ict@gov.in. आणि pmkisan-funds@gov.in या अधिकृत मेल आयडींवर शेतकरी यासंबंधी तक्रार करू शकतात.
एक हेल्पलाईन नंबरही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे जारी केलेला आहे. 011-24300606, 155261 या हेल्पलाईन नंबरवरही शेतकरी थेट तक्रार करू शकतात.