
Sharad Pawar : शरद पवार यांनी 1978 मध्ये महाराष्ट्रात दगा फटका आणि विश्वासघाताच राजकारण सुरू केलं जे 2024 च्या निवडणुकीत जनतेने नाकारलं तसेच घराणेशाहीचे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचा विश्वासघातही जनतेने नाकारला 2024 च्या निवडणुकीत लोकांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली हे विधान अमित शहांनी 12 जानेवारीला शिर्डीत भाजपच्या महाधिवेशनामध्ये केलं शरद पवारांवर अमित शहांनी ही टीका केल्यानंतर शरद पवारांनी सुद्धा शहांच्या टीकेला उत्तर दिलं.
पवार म्हणाले मला शहांची टीका जिव्हारी लागली नाही पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं होतं या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं मी 1958 पासून राजकारणात आणि प्रशासनात आहे मी 1978 राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी हे शहा राजकारणात कुठे होते हे मला माहित नाही थोडक्यात शरद पवारांनी आपल्या राजकारणाचा इतिहास लोकांपुढे मांडून अमित शहा शहांवर टीका केली.या कलगी दुर्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अमित शहा आणि शरद पवार आले पण एकीकडे केंद्रात नरेंद्र मोदींसोबत शरद पवारांचे चांगले संबंध असताना शहा आणि पवारांमध्ये नेमका काय वाद आहे यामागच्या राजकारणाची कहाणी काय पाहूयात या लेखामधून शरद पवारांनी महाराष्ट्रात दगा फटक्याच्या राजकारणाची सुरुवात केली असं अमित शहांनी म्हटलं खरं तर विधानसभा निवडणुकीत अमित शहांनी अपवादात्मक एक दोन वेळेस सोडलं तर शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि या निकालात भाजपला मिळालेल्या यशानंतर अमित शहांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धारेवर धरल्याचं दिसतंय यातले अमित शहांचे शरद पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाढलं हे शब्द महत्त्वाचे कारण शरद पवारांविरोधात अशी आक्रमक भाषा सहसा कोणी वापरत नाही पण अमित शहांनी ती वापरली त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा अमित शहांचा इतिहास काढला.
पवारांनी अमित शहांचा उल्लेख तडीपार गृहमंत्री म्हणून केला तसेच पवार शहांबद्दल पुढे असेही म्हणाले की अमित शहा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती आता पवारांनी इथं बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः सोबत जोडलं आता शरद पवार आणि शहा यांच्यामध्येपहिल्यांदाच वाद झाले का तर नाही 2024 च्या विधानसभा निवडणुकांना आधी जुलै 2024 मध्ये पुण्यातील पक्षाच्या कार्यक्रमात अमित शहा आणि शरद पवार यांना भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार असं म्हटलं होतं नरेंद्र मोदी यांनी पुण्यात पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता पण पवारांनी उत्तर दिलं ते अमित शहा यांच्याच टीकेला मोदींची भेट घेणाऱ्या फडणवीसांना सॉफ्ट कॉर्नर देणाऱ्या पवारांचा अमित शहांवरच राग का या दोघांमध्येच वैर का तर याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवार अमित शहांना महाराष्ट्रात पडलेल्या पक्षफुटीसाठी जबाबदार धरतात जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली केली शिंदे यांच्या या बंडाची कहाणी दिल्लीत रचल्याचं बोललं जातं ज्याचे सूत्रधार अमित शहा असल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारांसह 40 आमदार महायुतीमध्ये सहभागी झाले.
राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यात अमित शहा जबाबदार असल्याचं बोललं गेलं कारण देवेंद्र फडणवीसांनी मी दोन पक्ष फोडून सत्तेत आलो असं म्हटलं असलं तरी यामागे मास्टरमाइंड अमित शहाच असल्याचं बोललं जातं कारण फडणवीस शहांशिवाय दोन पक्ष फोडण्याचं पाऊल कसं उचलतील असा प्रश्न विचारला जातो पवारांनी शून्यातून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करत जोडून घेतलेली शिवसेना या सगळ्या राजकीय आखणीला शहांनी सुरुंग लावला आणि इथेच ठिणगी पडली पवारांचं अमित शहांसोबत राजकीय वैर असण्यामागचं दुसरं कारण म्हणजे अमित शहांकडे असणारं सहकार खातं अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे सहकार खातंही आहे आता इथं संबंध जुळतो महाराष्ट्राच्या सहकाराचा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राशी शरद पवारांचा आजही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संबंध आहे
पण दुसरीकडे केंद्रात सहकार खातं अमित शहा यांच्याकडे त्यामुळे महाराष्ट्राच्या सहकारावर कंट्रोल करण्यासाठी हे दोन्ही नेते झगडत असतात असंही बोललं जातं 2021 मध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर इडीने केलेली कारवाई त्याआधी 2019 महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांचं आलेलं नाव हे शरद पवार आणि अमित शहांच्या राजकीय या भांडणाचं प्रमुख कारण सांगितलं जातं 2019 जेव्हा महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांना नोटीस आली होती त्यावेळी ही नोटीस नरेंद्र मोदी विदेशी दौऱ्यावर असताना काढली होती असंही म्हटलं जातं कारण नरेंद्र मोदी भारतात असते तर त्यांनी शरद पवारांवर ही कारवाई करू दिली नसती अशी ही चर्चा होते आता पवारांचा विधानसभेत पराभव झाला असला तरी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर त्यांचं अजूनही वर्चस्व असल्याचं सांगितलं जातं त्याच वर्चस्वाला टक्कर देण्याचा प्रयत्न अमित शहा करत असल्याचा ही बोललं जातं साहजिकच सत्तेपर्यंत नेणाऱ्या सहकारावरच्या वर्चस्वाचा मुद्दा वादाचं कारण ठरतो पवार आणि शहांमध्ये राजकीय वैर असण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवारांच्या हातून गेलेला पश्चिम महाराष्ट्र ज्या पश्चिम महाराष्ट्रावर गेली कित्येक वर्ष पवारांच्या राष्ट्रवादीचं एक हाती वर्चस्व होतं त्याच पश्चिम महाराष्ट्रात पवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळालं पवार गटाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फक्त दहा जागा मिळाल्या महायुतीने मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून 70 जागांपैकी 58 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातील फक्त 12 जागा जिंकता आल्या पवारांचा महाराष्ट्रातील हा गड अमित शहांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे ढासळल्याचं बोललं जातं
कारण पश्चिम महाराष्ट्र हा सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे सहकार खातं अमित शहा यांच्याकडे त्यामुळे शहांना शरद पवारांचा पराभव करणं सोपं गेलं असं म्हटलं जातं याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात अमित शहांनी पवारांविरोधात सक्रिय केलेल्या बूथ स्तरावरील यंत्रणा सुद्धा शरद पवार गटाच्या पराभवाचं कारण समजलं जातं थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रावरच्या वर्चस्वातून या दोघांमधला वाद शिगेला गेल्याचं पाहायला मिळतं पवार आणि शहांमध्ये वैर असण्याचं चौथं कारण म्हणजे अमित शहांचा शतप्रतिशत भाजपचा नारा अमित शहा यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुका होण्याआधी प्रचार सभांमधून देशात शतप्रतिशत भाजप हा नारा दिला होताच पण त्यानंतर पुन्हा शहांनी या भाजपच्या अधिवेशनात शतप्रतिशत भाजपचा नारा दिलाय आणि यावेळी शहा यांनी फक्त नाराच दिला नाही तर कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड काम करून गावागावात भाजप पोहोचवण्याच्या सूचना देखील दिलाय शहांचा हा शतप्रतिशत भाजपचा नारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना चांगलाच अंगलट येऊ शकतो आणि यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीच्या हातून नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदाही जाण्याची शक्यता तयार होते
आता दुसरीकडे शरद पवारांना मात्र आपलं राजकारण वाचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राहिलायत यात शरद पवारांना अपयश आलं तर शरद पवारांच्या राजकारणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील आता यात शरद पवारांना सगळ्यात मोठा अडथळा अमित शहांचा शतप्रतिशत भाजप हाच नारा ठरू शकतो पवार आणि शहा यांच्या भांडणाचा फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र नक्की होऊ शकतो कारण उद्या फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर पवार आपलं वजन फडणवीस यांच्या बाजूने टाकू शकतात पण अमित शहा या शर्यतीत असतील तर पवार आपली ताकद विरुद्ध दिशेला फिरवू शकतात त्यामुळे फडणवीस या भांडणाचे लाभार्थी होऊ शकतात असंही बोललं जातंय थोडक्यात पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण त्या निमित्ताने येणारे सहकार क्षेत्र आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे शरद पवार आणि अमित शहा यांच्यात कलगीतुरा रंगल्याची चर्चा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अमित शहा यांच्यात वाद का रंगलाय आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने
पाहण्यासाठी पहा कृषी २४ तास (krishi 24.com).