सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र जोरात चर्चा सुरु आहे .परंतु , अद्यापही काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे किंवा कागदोपत्रांची पूर्तताच्या अनुषंगाने काही बदल सूचवण्यात आले आहेत . त्यानुसार, झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 6 नवीन नियम व अटी पूर्तता करण्यात आली आहे त्यानुसार, लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल व तो लवकरच लागू देखील करण्यात येईल.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय म्हणजे,
◼️ प्रत्येक शनिवारी ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची यादी वाचन करुन दाखवली जाईल व त्यात बदल केले जातील .
◼️ नवीन लग्न झालेल्या महिलेची विवाह नोंदणी करणे लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार तिच्या पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा जमा केला तर तो ग्राह्य धरला जाईल.
मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी व शर्ती
१. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे.
२. पोस्ट बँक खाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
३.प्रत्येक शनिवारी ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे.
४. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
५. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
6. दहा मिनिटांचा कालावधी ओटीपीचा करण्यात यावा
तसेच लवकरात लवकर शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करावी, असा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला .
15 ते 19 ऑगस्टला मिळणार पहिला हफ्ता .
त्याच प्रमाणे , जास्तीत जास्त सोपी व सहजतेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार,कागदपत्रांमध्ये राज्य सरकारने शिथिलता आणली आहे. त्यात, प्रत्येक शनिवारी आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत लाभार्थी महिलांची यादी वाचन करुन दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे . लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार आहे . महिला भगिनींना 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे .