सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी शेती भाड्याने द्या व हेक्टरी वर्षाला 75 हजार रुपये मिळवा

Solar Power Project सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी शेती भाड्याने द्या व हेक्टरी वर्षाला 75 हजार रुपये मिळवा.

Solar Power Project  नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी लाभदायक बातमी म्हणजे शासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी
शेती भाड्याने द्या व वर्षाला येथे 75 हजार अशी योजना चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना 
दिलासा देणारी बातमी असून शेतकऱ्यांना दिवस 12 तास वीज मिळावी या हेतूने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत आता लागणाऱ्या जागेसाठी शेतकऱ्यांना मोबदला सुद्धा देण्यात येणार आहे प्रति हेक्टर प्रतिवर्षी 75 हजार इतके भाडे देण्यात येणार असून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

सध्याच्या काळामध्ये विजेचा तुटवडा भासत असून कृषी क्षेत्रामध्ये 24 तास वीज पुरवठा करता यावा यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना अमलात आणली असून ही योजना 2017 पासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत सरकार दर दिवशी 2 मेघावट वीज निर्मिती करणार आहे यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्याला महावितरण एकरी 30 हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणारी योजना आहे संपूर्ण राज्यामध्ये एकूण वापरा पैकी कृषी क्षेत्रासाठी 30 टक्के उर्जेचा वापर करण्यात येतो त्यामुळे राज्यांमधील शेतकऱ्यांनी नियमित वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने 14 जून 2017 पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. योजनेमधून होणाऱ्या वीजनिर्मितीमधून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे यामुळे शेतकऱ्यांची मोठी वीज निर्मितीची समस्या दूर होणारा असून या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

 

Solar power project मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना काय आहे ते पहा

 

महावितरणच्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरात शेतजमिनीवर सोलर प्लेट उभारून दरदिवशी दोन मेगावॅट निर्मितीचा हा प्रकल्प आहे. ही वीज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातून गावोगावी वीज पुरवठा होईल. यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

 

 

वर्षाला हेक्टरी 75 हजार रुपये भाडे मिळणार

 

शेतकऱ्यांनी या योजनेसाठी शेत जमिनी दिल्यास शेतकऱ्यांना प्रतिवर्षी हेक्टरी 75 हजार रुपये भाडे म्हणून मोबदला महावितरण करून देण्यात येणार व त्या ठिकाणी निर्माण झालेली वीज शेती शिवारासाठीच वापरली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.


शेतकरयांना फायदा कसा होऊ शकतो

एकाद्या शेतकऱ्याकडे जर न वापरातील
, पडीक किंवा डोंगराळ जमील असेल तर अशी जमीन शेतकरी भाड्याने सरकारला देऊन ह्या योजनेतून
पैसे कमवू शकतात.

 

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावे

 

राज्य शासनाकडून मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना अमलात आणलेले असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणाचे अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता तसेच उपकेंद्राच्या उप अभियंतांना संपर्क करावा लागणार आहे त्यांच्याकडून या योजनेविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *