राज्याच्या विधानसभा निवडणुक निकाला दिवशी अनेक बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली. काही ठिकाणी सोयाबीनचे कामी कमी बाजारभाव ११०० रुपयांपर्यंत घसरले.
आज नेर परसोपंत बाजारसमितीत सोयाबीनचे कमीत कमी बाजारभाव ११०० रुपये प्रति क्विंटल इतके कमी राहिले. याठिकाणी आज १८८ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. सरासरी बाजारभाव ३७६७ रुपये राहिले.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजारसमितीत सोयाबीनचे बाजारभाव सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल इतके राहिले. तर हिंगणघाट बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ३६०० रुपये बाजारभाव मिळाला.
अमरावती बाजारात सुमारे चार हजार क्विंटल आवक झाली, कमीत कमी दर ३८५०, तर सरासरी ३९७५ रुपये प्रति क्विंटल इतके राहिले.
अकोला बाजारात सोयाबीनची सुमारे चार हजार क्विंटल आवक होऊन पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४१९५ रुपये बाजारभाव मिळाला. तर लातूरच्या मुरुड बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४१०० रुपये बाजारभाव मिळाला.












