Soybean Bajarbhav : या बाजारात मिळाला सोयाबीनला सर्वाधिक भाव*

Soybean Bajarbhav : सध्या सोयाबीनला ३७०० रुपये ते ४२०० रुपये सरासरी दर सुरू आहेत. पिवळ्या सोयाबीनला बऱ्यापैकी दर असून मागील सप्ताहात सोयाबनच्या किमती अगदी किरकोळ वाढल्याचे दिसून आले. काल दिनांक ९ डिसेंबर रोजी लातूर बाजारात सोयाबीनची सुमारे २४ हजार क्विंटल आवक झाली. सरासरी बाजारभाव ४१७० असे होते.
दरम्यान मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४२५० प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ०.२ % वाढ झाली आहे. बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने ही माहिती दिली आहे.

सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

या बाजारात सोयाबीन वधारला:
मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर १० टक्केनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या रु.४४३४/ क्विंटल.) तर इंदोर बाजारात सरासरी किंमती रु. ४१२१/ क्विं. कमी होत्या.11:40 AM

 

Leave a Reply