soybean bajarbhav : सोयाबीनच्या बाजारभावांची घसरगुंडी अजूनही सुरूच असून या आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव आता ४ हजारांच्याही खाली उतरले आहेत. बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ३९६६ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर पांढऱ्या सोयाबीनला ४ हजार रुपये भाव मिळाला. किमान हमीभावापेक्षा हा दर तब्बल हजाराने कमी आहे. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
दुसरीकडे वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनला ४४०७ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बुधवारी या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची ९५०० क्विंटल आवक झाली होती. हिंगोली बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ३७०० रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान १५ डिसेंबर रोजी संपलेल्या मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४११० प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ३.३% घट झाली आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.
-मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ३७ टक्केनी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी इंदोर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४२०८/क्विंटल.) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती रु.३८९९/क्विंटल इतक्या. कमी होत्या.02:35 PM