दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाच्या वतीने गाय दूध खरेदी अनुदान ३४ लाख तीन हजार जुलै व ऑगस्ट महिन्याचे तब्बल १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये वर्ग केले आहेत . उर्वरित पंधरा लाख शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा दुग्ध कार्यालय ते आयुक्त कार्यालय यांच्या पातळीवर प्रलंबित आहे. हे अनुदान आठ-दहा दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
गाय दुधाचे उत्पादन राज्यामध्ये वाढले आहे. उन्हाळ्यामध्ये गाय व म्हशीचे दूध कमी होते, परंतु या वर्षी गायीचे दूध कमी न होता वाढतच गेले. त्यामध्ये गाय दूध पावडर व बटरला मागणी नसल्यामुळे त्याचे दर घटले आहे . त्यामुळे गाय दूध घेणाऱ्या खासगी व सहकारी संघांनी दर कमी केले.या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ११ जानेवारी ते १० मार्च या महिन्यात राज्य शासनाने पहिल्या टप्यात प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले.
तरीही दूधाच्या दरात वाढ झाली नाही त्यामुळे १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत अनुदान कायम ठेवण्यात आले . दूध संस्थांच्या पातळीवर ही माहीती भरण्यात येते जुलै व ऑगस्ट महिन्याची बहुतांशी माहीतीभरली असल्यामुळे अनुदान जमा करण्यात आले.
१०८९ फाईलच्या माध्यमातून ३४ लाख ३ हजार ७६४ दूध उत्पादकांच्या २९ कोटी १ लाख ३७ हजार २७१ लिटर दूध संकलनाची माहिती राज्यातील विविध दूध संघांनी भरली आहे. त्याचे १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार ३५ रुपये अनुदान जमा केले आहे.
दृष्टीक्षेपात राज्याचे अनुदान
■ उत्पादक : ३४ लाख ३ हजार ७६४
■ अनुदान : १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार
■ दूध संकलन : २९ कोटी १ लाख ३७ हजार २७१
१२ लाख जनावरांची नोंद जानेवारी ते मार्च अनुदानासाठी झाली होती.३०० कोटींचे वाटप या कालावधीत सुमारे केले होते. पण, आता २६ लाख नोंदणी झाली आहे. नियमित अनुदान मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा नोंदणीकडे कल वाढला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलै, ऑगस्टचे अनुदान वर्ग केले जात आहे. उर्वरित अनुदानही लवकर देण्याचे दुग्ध विभागाचे प्रयत्न चालू आहेत.