kanda bajarbhav : सोमवारी कांद्याची आवक घटली; असे आहेत कांदा बाजारभाव…

kanda bajarbhav :  मागील सप्ताहात नाशिकसह महत्त्वाच्या बाजारपेठांत सोमवारी लिलाव सुरू झाले तेव्हा कांदा आवक तब्बल ४ लाख ३४ हजार क्विंटल इतकी झाली होती. त्यानंतरच्या पुढील दोन दिवसात ती सरासरी ३ लाख क्विंटलच्या आसपास होती. मात्र या आठवड्यातील सोमवारी म्हणजेच २३ डिसेंबर रोजी आवक थोडी घटली आहे.

ॲगमार्कनेटकडून प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी राज्यात कांद्याची ३ लाख ३ हजार क्विंटल आवक झाली. लासलगाव बाजारात लाल कांदयाला कमीत कमी ७०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २८५१ रुपये तर सरासरी १७२५ रुपये बाजारभाव मिळाला.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत पोळ कांद्याला सरासरी १८०० रुपयांचा दर होता. पुणे बाजारात लोकल कांद्याला २२५० रुपये सरासरी दर मिळाला, तर सोलापूर बाजारात कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त साडेचार हजार आणि सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

मागील सोमवारच्या तुलनेत या सोमवारी कांद्याची आवक तब्बल सव्वा लाख क्विंटलने घटली आहे. ही आवक अशीच राहिली तर संपूर्ण आठवडयात आवक मर्यादित राहून दर जास्त घसरण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान मागच्या सोमवारी संपूर्ण देशभरात कांदा आवक ७ लाख ६० हजार क्विंटल इतकी होती. ती या सोमवारी बाजार सुरू होताना घटली असून संपूर्ण देशात सोमवारी कांदा आवक ५ लाख ६८ हजार क्विंटल इतकी आहे. या घटीत राज्यातील कांदा आवकेचा मोठा वाटा आहे.

Leave a Reply