केंद्र सरकारने ग्रामीण भारतामधील शेतीशी निगडित महिलांना सक्षम करण्यासाठी ‘नमो ड्रोन दिदी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ड्रोन ने खते व कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन पायलट म्हणून बचत गटातील महिलांना प्रशिक्षण दिले आहे .
मध्य प्रदेशामधील १०२ ड्रोन दिदींनी या योजनेअंतर्गत एकाचवेळी ड्रोन उडविण्याचा विक्रम केला आहे.हा कार्यक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च सेंट्र, फंदा येथे झाला या कार्यक्रमामध्ये मध्य प्रदेशामधील ८९ आणि उर्वरित महाराष्ट्रातील महिला ड्रोन पायलटचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून या योजने मध्ये मध्य प्रदेशामधील ८९ आणि उर्वरित महाराष्ट्रातील महिलांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे या सर्व ड्रोन पायलट महिलांनाप्रशिक्षण देण्यात आले आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एकाचवेळी १०२ ड्रोन दीदींनी ड्रोन उडवत विक्रम केला आहे.
काय आहे ही योजना?
ग्रामीण भागातील महिलांना शेतीशी संबंधित बाबीमध्ये सक्षम करण्यासाठी ड्रोन दीदी योजना राबविली जात आहे. या योजनेची सुरूवात ३० नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आली होती . या योजनेंतर्गत बचत गटांशी संबधित महिलांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी पाच दिवसांचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते. प्रशिक्षण झाल्यानंतर परिक्षा उत्तीर्ण व्हावे लागते .या ड्रोन पायलटना त्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात येते.
योजनेचा फायदा
या योजनेचे खूप फायदे आहेत. या योजनेतुन महिलांना सक्षम करणे ही प्राथमिकता आहे. महिलांना रोजगारासह आर्थिक सक्षम होण्यास या योजनेमुळे मदत होते. याशिवाय शेतीतील उत्पादकता तसेच कार्यक्षमता वाढून शेतीत होणारा खर्च कमी होईल . महिलांना या योजनेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात तसेच आर्थिक सक्षम होण्यास मदत होते.
किती मानधन मिळणार?
१० ते १५ गावांचा एक क्लस्टर तयार करून ड्रोन उडवणाऱ्या महिलांना देण्यात येईल . यापैकी एका महिलेची निवड ‘ड्रोन सखी’ म्हणून करण्यात येईल . यानंतर निवडलेल्या इतर ड्रोन सखींना १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल . तसेच या योजनेतून त्यांना दरमहा १५ हजारांचे मानधन दिले जाईल.












